तरुण भारत

बंदी उठविण्याची कनेरियाची पीसीबीला विनंती

वृत्तसंस्था/ कराची

2013 साली स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने पाकचा माजी क्रिकेटपटू आणि फिरकी गोलंदाज दानिश कनेरियावर पाक क्रिकेट मंडळाने (पीसीबीने) आजीवन बंदी घातली आहे. दरम्यान आपल्यावरील ही बंदी उठविण्याची विनंती कनेरियाने पाक क्रिकेट मंडळाला केली आहे.

Advertisements

स्थानिक क्रिकेट क्षेत्रात पुनरागमन करण्यासाठी आपण उत्सूक असल्याचे कनेरियाने म्हटले आहे. राष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला खेळण्याची परवानगी द्यावी, असे कनेरियाने पीसीबीला पाठविलेल्या लेखी पत्रामध्ये म्हटले आहे. पीसीबीचे अध्यक्ष मणी यांनी ही माहिती दिली असून कनेरियाला आणखी एक संधी देण्यासाठी पीसीबी विचाराधीन आहे, असे त्यांनी सांगितले. 2012 साली इंग्लीश आणि वेल्स क्रिकेट मंडळाने कनेरियावर आजीवन बंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरूद्ध पीसीबीने दाद मागितली होती पण पीसीबीचे अपील फेटाळण्यात आले. पाकचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद आमीर आणि सलमान बट्ट यांच्यावरही स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदी घातली होती पण त्यानंतर त्यांना राष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यास पीसीबीने परवानगी दिली होती. मोहम्मद आमीर आणि सलमान बट्ट यांच्याप्रमाणेच मलाही राष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यास परवानगी द्यावी, असे दानिश कनेरियाने म्हटले आहे. कनेरियाने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 61 कसोटीत 34.79 धावांच्या सरासरीने 261 बळीं घेतले आहेत. तसेच त्याने 2000 ते 2007 या कालावधीत 18 वनडे सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले होते.

Related Stories

ओमान क्रिकेटकडून मुंबईला निमंत्रण

Patil_p

पाटणा पायरेट्सची तेलुगू टायटन्सवर निसटती मात

Patil_p

टी-20 मानांकनात शफालीचे अग्रस्थान कायम

Amit Kulkarni

कॅगिसो रबाडा चौथ्या कसोटीतून निलंबित

Patil_p

मॅटेव बेरेटिनी, हय़ुबर्ट हुर्काझची उपांत्य फेरीत धडक

Amit Kulkarni

सिंगापूर, जपान, अझरबैजान ग्रां प्रि शर्यती रद्द

Patil_p
error: Content is protected !!