तरुण भारत

30 जूनपर्यंत चर्च राहणार बंद

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून परिस्थितीमध्ये सुधारणा होताना दिसत नाही. अद्यापही नागरिकांच्या मनामध्ये गर्दीबाबत भीती असल्याने 30 जूनपर्यंत सर्व चर्च बंद राहतील, असा निर्णय बेळगाव डायोसिसचे बिशप डेरेक फर्नांडीस यांनी घेतला आहे.

Advertisements

लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर मंदिरे, गुरूद्वार, चर्च, मशिदी खुली करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. परंतु चर्चमध्ये सामूहिक प्रार्थनेवेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन 13 जूनपासून चर्च सुरू करण्याचा निर्णय बेळगाव डायोसिसकडून घेण्यात आला होता. परंतु कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे समाजातील इतर प्रमुखांशी चर्चा करण्यात आली. चर्चेअंती 30 जूनपर्यंत चर्च बंद ठेवण्याचा निर्णय बेळगाव डायोसिसने घेतला आहे. त्यामुळे ख्रिश्चन बांधवांनी 30 जूननंतरच चर्चमध्ये यावे, असे आवाहन करण्यात आले आहे..

Related Stories

दुकानांवरील फलकांवर कोणत्याही भाषेची सक्ती नको

Omkar B

भाजी मार्केट बंद ठेवल्याने शेतकऱयांची गैरसोय

Amit Kulkarni

कोरोनाच्या सावटाखाली आजपासून विधिमंडळ अधिवेशन

Patil_p

गोवावेस बसवेश्वर सर्कलमध्ये साचले पावसाचे पाणी

Amit Kulkarni

जिह्यात सव्वादोन लाखांवर स्वॅब तपासणी

Patil_p

सर्वा लोकसेवा फौंडेशनतर्फे मास्कचे वितरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!