तरुण भारत

शहापूर गटारींच्या खोदाईमुळे नागरिकांना त्रास

प्रतिनिधी/ बेळगाव

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील रस्ते व गटारी करण्याचे काम हाती घेण्यात आली आहे पण हे स्मार्टसिटीचे  काम चालू असताना शहरातील रस्त्यांची अवस्था बकाल झाली आहे. ठिकठिकाणी गटारी करण्यासाठी खड्डे काढण्यात आले असून मातीचा व दगडांचा ढिगारा  रस्त्याच्या दुतर्फा पाहायला मिळत आहे.

Advertisements

शहापूर खडे  बाजार मधील  परिस्थिती काहीशी अशीच झाली आहे. येथील व्यवसायिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता येथील गटारी खोदण्यात आल्यामुळे व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आधीच लॉकडाउनमुळे सर्व व्यवसाय बंद होते त्यातच सर्व व्यवसाय पूर्वपदावर येत असताना   पुन्हा खोदाई करण्यात आल्यामुळे येथील व्यवसायिकांना फटका बसला असल्याचे येथील व्यावसायिकांनी म्हटले आहे.

गटारी खोदाई  कामे पावसाळय़ापूर्वी पूर्ण करायची होती पण आता ऐन पावसाळय़ात स्मार्ट सिटी चे काम चालू करण्यात आल्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून ग्राहकांना दुकानात जाताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे दुकानातून डायरेक्ट  गटारीत अशी परिस्थिती येथील व्यवसायिकांची आहे.

येथील खोदण्यात आलेल्या गटारी मध्ये माती व दगड  अडकल्यामुळे गटारीचे पाणी उलटय़ा बाजूने वाहत आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे सर्वत्र चिखल  झाला आहे.

तसेच हे स्मार्ट सिटी चे काम करण्यास वीस ते पंचवीस वयोगटातील मुले आहेत. ते ओबडधोबड काम करत असून काही नागरिकांच्या इमारतीला  धक्का बसला आहे.   या ठिकाणी कोणताही अधिकारी किंवा सुपरवायझर येऊन भेट न दिल्यामुळे हे काम असेच चालू आहे. त्यामुळे येथील व्यवसायिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Related Stories

अनगोळच्या स्मशानभूमीची अवस्था दयनीय

Omkar B

शिवपुतळा चौथरा कामाचा बाळेकुंद्री खुर्द येथे शुभारंभ

Amit Kulkarni

नैर्त्रुत्य रेल्वेने केली 700 टन माल वाहतूक

Patil_p

केएलईत आजपासून लहान मुलांना मोफतलसीकरण

Amit Kulkarni

जिल्हय़ात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट

Omkar B

अनलॉकमुळे वाहन नोंदणीसाठी उडाली झुंबड

Amit Kulkarni
error: Content is protected !!