तरुण भारत

सेनेच्या माजी जिल्हा प्रमुखांना पालिकेत धक्काबुक्की

पेव्हर ब्लॉकच्या कामात आडकाठी आणल्याच्या रागातून ठेकेदाराकडून मारहाण,

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

सातारा नगरपालिका अगोदरच भ्रष्टाचारावरुन वादाच्या भोवऱयात सापडली आहे. त्यातच दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बांधकाम विभागाच्या केबीनमध्ये सेनेचे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील यांना ठेकेदार गणेश यांनी मारहाण केल्याची घटना घडली. नरेंद्र पाटील यांनी पेव्हर ब्लॉकची बील काढू नका, अशी तक्रार केल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बांधकाम विभागातील अभियंत्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणावरुन नरेंद्र पाटील यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडे कैफियत मांडली असून याची नोंद दुपारपर्यत शहर पोलिसांत झाली नव्हती. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनीही मला काही माहिती नव्हते. माहिती घेतो, असे सांगितले.

सातारा पालिकेत अगोदरच 2 लाख 30 हजाराच्या लाचेच प्रकरण ताजे असतानाच सोमवारी सकाळी बांधकाम विभागात शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील हे आले. त्यांनी अभियंत्यांना पेव्हर ब्लॉकचे काम निष्कृष्ट झाले आहे. बील काढू नका, असा आग्रह धरला होता. त्यावरुन तेथे उपस्थित असलेल्या ठेकेदार गणेश पवार यांनी त्यांना मारहाण केली. मारहाण होताना नरेंद्र पाटील हे खुर्चीत बसलेले होते. बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी ही वादावादी थांबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ही घटना लगेच पालिकेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पालिकेत नरेंद्र पाटील यांना मारहाण झाल्याचे समजताच वातावरण तणावपूर्ण झाले होते. नरेंद्र पाटील यांचे कार्यकर्ते लगेच आले. दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी घडलेला प्रकार व बांधकामाबाबतची तक्रार मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडे केली. याची नोंद शहर पोलिसांत झाली नव्हती.

बोकाळलेल्या ठेकेदारीला चाप लावू

गेल्या वर्षापासून शहरात आठ-नऊ कामे शिंदे कॉन्ट्रक्टर यांनी घेतली होती. ही कामे सब ठेकेदार गणेश पवार हा करत होता. अतिशय निकृष्ट दर्जाची कामे करत होता. कुठलेही काम दर्जेदार नव्हते. चेंबर बांधले नव्हते. विशेषतः सिव्हिल हॉस्पिटल ते पारंगे हॉस्पिटल रस्ता या सर्व कामाबाबत मी वेळोवेळी सातत्याने आवाज उठवला. कामे निट झाल्याशिवाय बील काढू नये, अशी तक्रार केली होती. त्यावरुन चिडून जावून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. असे किती हल्ले करण्याचा प्रयत्न केला आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही. बोकाळलेल्या ठेकेदारीला चाप लावणारच, असे नरेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मला पत्रकारांकडूनच घटना कळाली

मी कामात होतो. शहरात कंटेटमेंट झोन करायचा आहे. त्याच्या नियोजनात होतो. मला पत्रकारांकडूनच कळाले आहे. याची पोलिसांत नोंद झाल्यानंतर चौकशी करुन कार्यवाही केली जाईल, असे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सांगितले.

Related Stories

जिल्हय़ातील पहिला रुग्ण झाला कोरोनामुक्त

Patil_p

जिल्हय़ातील पर्यटनस्थळांवर विकेंड दिवशी पर्यटकांना बंदी

Omkar B

चित्रपटगृहे आठवडाभर बंदच

Patil_p

सातारा : माजगाव लूट प्रकरणातील तीन संशयित बोरगाव पोलिसांच्या जाळ्यात

Abhijeet Shinde

युवा कीर्तनकाराचा आवाज पोहोचला मुंबई दरबारी

Amit Kulkarni

पाच जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह; नऊ अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!