तरुण भारत

जिह्यातील रूग्णसंख्येचा आकडा अडीचशे पार

आज नवीन सहा रूग्ण वाढले
शिराळा, तासगाव आणि खानापूर तालुक्यातील रूग्णांचा समावेश
पाच महिन्याच्या बाळाचा समावेश

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

सोमवारी नवीन सहा रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिह्यातील एकूण रूग्णसंख्या २५३ झाली आहे. जिह्यातील शिराळा, तासगाव आणि खानापूर तालुक्यात हे रूग्ण वाढले आहेत. सोमवारी एकही रूग्ण कोरोनामुक्त झाला नसल्याने उपचारातील रूग्णसंख्या १२० झाली आहे.

नवीन सहा रूग्ण वाढले
जिह्यातील शिराळा तालुक्यातील खेड येथील १२ वर्षाचा मुलगा, बिळाशी येथील ६० वर्षाची व्यक्ती आणि मणदूर येथील पाच महिन्याची मुलगी असे तीन रूग्ण या तालुक्यात वाढले आहेत. खानापूर तालुक्यातील भिकवडी येथील ४८ वर्षीय महिला, तसेच ३३ वर्षीय महिला आणि तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील ६० वर्षीय व्यक्ती असे एकूण सहा नवीन रूग्ण वाढले आहेत. या सर्वांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

पाच महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण
शिराळा तालुक्यातील मणदूर येथील पाच महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. या बाळाची आई पॉझिटिव्ह आल्यानंतर या बाळाचा स्वॅब तपासल्यानंतर हे बाळ ही कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या बाळावर आता कोरोना रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. मणदूर हा कोरोना हॉटस्पॉट ठरला आहे. या एकाच गावातून आजपर्यंत ४८ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.

चौघांच्यावर अद्यापही अतिदक्षता विभागात उपचार सुरू
सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील ६० वर्षीय व्यक्ती, कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील ५० वर्षीय महिला, विटा-हनुमंतनगर येथील ३४ वर्षीय व्यक्ती आणि कडेगाव तालुक्यातील वांगी येथील ६९ वर्षीय व्यक्ती यांची प्रकृती मात्र अद्यापही चिंताजनक आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

कोरोनाची जिह्यातील स्थिती
एकूण रूग्ण २५३
बरे झालेले १२५
उपचारात १२०
मयत ०८

Related Stories

मागील 24 तासात महाराष्ट्रात 434 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह; 4 मृत्यू

Rohan_P

सातारा शहरात दोन दिवसात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू,

Patil_p

महाराष्ट्रात 7 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

कडेगाव तालुक्यात मुसळधार पावसाने ऊस भुईसपाट

Abhijeet Shinde

हो आम्ही सातारचे पोलीस!

Patil_p

कारवाईत 32 लाखाचा मुद्देमाल जप्त

Patil_p
error: Content is protected !!