तरुण भारत

सार्वजनिक गणेशोत्सव यंदा मर्यादित स्वरुपात

सांस्कृतिक कार्यक्रम, विसर्जन मिरवणूक, देणगी कुपनना कात्री : मूर्तीही छोटय़ा आकाराच्या

प्रतिनिधी / फोंडा

Advertisements

कोरोना महामारीच्या वाढत्या संक्रमणामुळे गर्दी होणाऱया सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आल्याने त्याचा परिणाम सार्वजनिक गणेशोत्सवांवरही जाणवणार आहे. ही शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा कुठलाच थाटमाट न करता अत्यंत साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याची तयारी ठेवली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद, विसर्जन मिरवणूक तसेच देणगी कुपन या सर्व कार्यक्रमांना कात्री लावण्यात आली आहे. यंदा गणेश चतुर्थी 22 ऑगस्टला आली असून लॉकडाऊनमुण्s बऱयाच मंडळांच्या अद्याप बैठकाही झालेल्या नाहीत. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची त्यांना प्रतिक्षा लागून राहिली आहे.

फोंडा तालुक्यात छोटे मोठी मिळून साधारण 15 ते 20 गणेशोत्सव मंडळे असून त्यापैकी काही मंडळांच्या बैठका नुकत्याच झाल्या. येत्या एक दोन आठवडय़ात अजून काही मंडळांनी बैठकांचे नियोजन केले आहे. मात्र एकंदरीत सर्वांमध्ये निरुत्साहाच दिसून येतो. गणपतीची पूजा सोडल्यास गर्दी टाळण्यासाठी इतर सर्व कार्यक्रम रद्द करणे सर्वांच्या हिताचे असल्याचे बहुतेक मंडळाचे मत आहे. सरकारकडूनही गणेशोत्सव मंडळांना अद्याप मार्गदर्शक तत्त्वे जाहीर झालेली नाहीत. काही मंडळांचा नऊ किंवा अकरा दिवस गणेशोत्सव साजरा करण्यापेक्षा दिवस कमी करण्याचाही विचार आहे. गणपतीच्या मूर्तीही छोटय़ा स्वरुपात असतील, तसेच भव्य मंडप व सजावटही असणार नाही.

क्रांतीमैदान फोंडा येथील सर्वात जुन्या सदर गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत केवळ औपचारिकता म्हणून समिती निवडण्यात आली. उत्सव समिती व एकंदरीत कार्यक्रमांची रुपरेषा सरकारची मार्गदर्शक तत्वे आल्यानंतरच ठरविण्यात येणार असल्याचे मंडळाचे सचिव जयवंत आडपईकर यांनी सांगितले. जुने बसस्थानक फोंडा येथील श्री झरेश्वर गणेशोत्सव मंडळाचाही अत्यंत छोटय़ा स्वरुपात उत्सव साजरा करण्याचा विचार आहे. येत्या 28 रोजी होणाऱया आमसभेत त्यासंबंधी निर्णय होणार असल्याचे मंडळाचे सचिव ऍड. जितेंद्र नाईक यांनी सांगितले. वरचा बाजार फोंडा येथील बुधवारपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचाही सर्व कार्यक्रमांमध्ये कपात करण्याचा विचार आहे. पूजाविधी पुरतेच उत्सवाचे स्वरुप ठेवले जाईल व गणपतीची मूर्तीही 4 ते 5 फूट एवढय़ा छोटय़ा आकाराची असेल, असे मंडळाचे अध्यक्ष नारायण नाईक यांनी स्पष्ट केले.

तिस्क उसगांव येथील पीडीए मार्केटमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मत असून पुजाऱयाचा सल्ला व सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्यांचा निर्णय होणार आहे. लोकांचे आरोग्य महत्त्वाचे असून गर्दीमुळे होणार संसर्ग टाळण्यासाठी यंदा उत्सव छोटय़ा व मर्यादित स्वरुपात साजरा करणे योग्य असल्याचे मंडळाचे सचिव अजय बागकर यांचे मत आहे. कुंडई सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पूजा विधी सोडल्यास इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र प्रथेनुसार गणपतीचे अनंत चतुदर्शीलाच विसर्जन होणार आहे, असे मंडळाचे पदाधिकारी शांतो नाईक यांनी स्पष्ट केले. येत्या 21 जून रोजी होणाऱया मंडळाच्या आमसभेत त्यासंबंधी सविस्तर चर्चा होणार आहे.

माशेलातील गणपती देखाव्यांबाबत अनिश्चितता

गणेशोत्सव काळात माशेल येथील भाविकांचे आकर्षण असलेले गणपती देखाव्यासंबंधी यंदा प्रश्नचिन्ह आहे. सुरक्षेचा प्रश्न व एकंदरीत परिस्थिती लक्षात घेतल्यास लोक उत्सवाच्या मूडमध्ये नसतील. त्यामुळे कलाकृती तयार करणे योग्य होणार नाही, असे देऊळवाडा माशेल येथील नावेलकर बंधूचे मत आहे. माशेल व कुंभारजुवा भागात भव्य व आकर्षक देखावे तयार करणाऱया बहुतेक कलाकारांनी अद्याप देखाव्यासंबंधी विचारच केलेला नाही.

मूर्तीचे आकारही छोटेच…!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी भव्य व आकर्षक मूर्ती तयार करणारे फोंडय़ातील प्रसिद्ध मूर्तीकार नंदादीप नाईक यांनी यांच्याशी संपर्क साधला असता, यंदा सर्व गणेशोत्सव मंडळांनी 4 ते 5 फुट उंचीच्या मूर्ती घडविण्याची ऑडर दिल्याचे सांगितले. नंदादीप नाईक हे फोंडय़ातील बुधवारपेठ गणेशोत्सव मंडळासह, म्हार्दोळ, बाजार शिरोडा, सांगे आदी मंडळांसाठी दरवर्षी नाविन्यपूर्ण गणेशमूर्ती तयार करतात. बहुतेक मंडळांकडून 9 ते 10 फूट उंचीची मूर्ती तयार करून घेतले जायची. यंदा उत्सवाचे स्वरुपच मर्यादित असल्याने मूर्तीचा आकारही छोटा असेल असे ते म्हणाले.

Related Stories

डिचोलीची वैशिष्टय़पूर्ण घोडेमोडणी साजरी.

Amit Kulkarni

राज्यात मगोचे स्थान आजही बळकट

Amit Kulkarni

वास्को शहर व परीसरात लॉकडाऊनला पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद, शहरात तुरळक वर्दळ

Amit Kulkarni

फोंडा शहर सायंकाळनंतर सामसूम

Amit Kulkarni

विलास मेथर खूनप्रकरणी संतोष पिल्लई गजाआड

Patil_p

रवी नाईक यांची लोकप्रियता कायम

Patil_p
error: Content is protected !!