तरुण भारत

भारती एक्सा जनरल इन्शुरन्स प्रीमियम उत्पन्नात 38 टक्क्मयांनी वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

खासगी क्षेत्रातील सर्वसाधारण विमा कंपनी भारती एक्सा जनरल इन्शुरन्सचे सकल प्रीमियम संकलन 2019-20 मध्ये 38 टक्क्मयांनी वधारुन 3,157 कोटी रुपयांवर राहिले. याच्या मागील वित्त वर्षातील समान कालावधीत कंपनीने 2,285 कोटी रुपयांचे प्रीमियम जोडले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

सदरच्या प्रीमियम संकलनामध्ये पीक, वाहन आणि आरोग्य विमा यांचे प्रमुख योगदान राहिले आहे. कंपनीने सर्व प्रकारच्या विमा विक्रीतून दहा अंकी उत्पन्नाची वाढ केली आहे. यामध्ये विमा प्रीमियम 59 टक्क्मयांनी वधारुन 828 कोटी, वाहन विमा संकलन 30 टक्क्मयांनी वाढून 1,143 कोटी रुपये, आरोग्य विमा प्रीमियमचे संकलन 23 टक्क्मयांनी वधारुन 410 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे.   

Related Stories

बीएस- 6 श्रेणीतील होंडा ग्रेझीया नव्या रुपात

Patil_p

शेअर बाजार तेजीची झुळूक नोंदवत बंद

Patil_p

जीओनीची स्मार्टवॉचेस बाजारात

Patil_p

आर्थिक विकासदर 4 टक्क्मयांवर : एडीबी

Patil_p

अंतिम दिवशी सेन्सेक्समध्ये घसरणीची नोंद

Patil_p

दूरसंचार कंपन्याकडून ब्रॉडबँड सेवेत सवलती

tarunbharat
error: Content is protected !!