तरुण भारत

युनिलिव्हरच्या उत्पादनांवर आता कार्बन उत्सर्जन लेबल

70 हजारपेक्षा अधिक उत्पादनांचा समावेश : 2039 पर्यंत कार्बन शून्यचे ध्येय

वृत्तसंस्था/ लंडन

सध्या बदलत्या वातावरणासोबत पर्यावरणात मोठय़ा प्रमाणात बदल होत असून याचा प्रभाव व्यवसाय जगतामध्ये होत आहे. यात अनेक संशोधकांच्या माहितीमधून ज्या कंपन्या पर्यावरणाशी संबंधीत व्यवसाय उभारतील त्यांनाच येत्या काळात मागणी राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ही बाब लक्षात घेत युनिलिव्हरने नवीन पर्याय निवडला आहे.

सन 2039 पर्यंत कंपनीने सर्व उत्पादनांची निर्मिती आणि वितरण प्रणाली राबवताना कार्बनची क्षमता शुन्य ठेवण्याचे ध्येय ठेवले आहे. योजनेच्या अंतर्गत कंपनी 70 हजारपेक्षा अधिक उत्पादनांवर लेबल लावून माहिती देणार आहे.

अन्य कंपन्यांची दिशा

युनिलिक्हर 110 कोटी डॉलर रक्कमेच्या माध्यमातून हवामान बदलाचा वापर करुन इको फ्रेंडली उपायावर खर्च करणार आहे. हाच पर्याय निवडत अन्य कंपन्यांनीही आपला प्रवास करण्याची गरज असल्याचे सीपीडी संस्थेने सांगितले आहे. 

कार्बन उत्सर्जनाची तीव्रता 

युनिलिव्हर सध्या वार्षिक आधारे जवळपास 10 कोटी टन कार्बन डायऑक्साइड गॅसचे उत्सर्जन करत असते. उत्सर्जन प्रकल्पामध्ये कोळसा, पेट्रोलियम आणि अन्य इंधनाचा वापर करण्यात येतो.

Related Stories

‘ओयो’ची आगामी गुंतवणूक युरोपात होण्याचे संकेत

Patil_p

परदेशात गुंतवणूक करताना…

Omkar B

मुकेश अंबानी जगातील श्रीमंतात 6 व्या स्थानी

Patil_p

कोरोना उपचारार्थ हेल्थ क्लेम 240 टक्के वाढला

Patil_p

भारतात इटीएफ ऍसेट्मध्ये लक्षणीय वृद्धी

tarunbharat

होम फर्स्टचा आज आयपीओ बाजारात

Patil_p
error: Content is protected !!