तरुण भारत

इपीएफओची मल्टी लोकेशन क्लेम सुविधा

सर्व प्रकारचे दावे सादर करण्याची सोय :

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

कर्मचारी भविष्य निवार्ह निधी संघटना (इपीएफओ) धारकांचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा कार्यरत करण्यावर भर देणार आहे. याचाच एक भाग म्हणून मल्टी-लोकेशन क्लेमची सुविधा इपीएफओने सुरु केली असल्याची माहिती कामगार मंत्रालयाने दिली आहे.

सदरच्यग नवीन सुविधेच्या आधारे दावा निकालात काढण्यासाठी आता भौगोलिक क्षेत्रावर आधारीत व्यवस्था करण्यात आली आहे. याच्या आधारेच इपीएफओच्या कोणत्याही विभागीय कार्यालयातून दावे निकालात काढता येणार असल्याचे सांगितले आहे.

या योजनेमधून सर्व प्रकारचे दावे निकालात काढण्यात येणार आहेत. ईपीएफओ कार्यालयात जाऊनच आता आपले दावे सादर करण्याऐवजी देशातील कोणत्याही ईपीएफओ कार्यालयामध्ये दावे दाखल करण्याची सुविधा मिळणार आहे.

देशातील कार्यालये

देशात 135 विभागीय कार्यालये आहेत. 72 तासांच्या आतमध्ये प्रक्रिया करुन सदरचे क्लेम हे कामगार मंत्रालयाच्या मदतीने निकालात काढण्यासाठीचे काम सुरु आहे. 75 टक्के दावे हे कोरोना संकटात दिले आहेत. यामध्ये जवळपास 8 कोटी ईपीएफओ खातेधारकांना दिलासा दिलेला आहे. सदर खातेदारांच्या खात्यात ऍडव्हान्स रक्कम काढण्याची सुविधा दिली आहे.

Related Stories

फ्लिपकार्टची जलद पुरवठा सेवा

Patil_p

विप्रोकडून ब्राझिलच्या आयटी कंपनीचे अधिग्रहण

Patil_p

टेक्नो स्पार्क पॉवर 2 स्मार्टफोन सादर

Patil_p

कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ 16 मार्चला

Amit Kulkarni

विप्रोचा 9,500 कोटी रुपयांचा बायबॅक सादर

Omkar B

सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक उच्चांकावर

Patil_p
error: Content is protected !!