तरुण भारत

..तर हाफीजची निवृत्ती लांबणीवर

वृत्तसंस्था/ लाहोर

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. दरम्यान कोरोना महामारी संकटामुळे सदर स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने पाकचा अष्टपैलू मोहम्मद हाफीजने आपल्या निवृत्तीचा निर्णयही लांबणीवर टाकणारा असल्याचे सांगितले.

Advertisements

पाकचा माजी कर्णधार 39 वर्षीय मोहम्मद हाफीजने आपल्या 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला येत्या नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर निरोप देण्याचा निर्णय घेतला होता. पण ऑस्ट्रेलियातील आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा नियोजित कालावधीत कोरोना महामारीमुळे घेणे अवघड वाटत आहे. आपण सध्या कोठेही क्रिकेट खेळण्यास तयार आहे, असेही तो म्हणाला. टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त होण्याचा आपला विचार आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी माझ्याकडून होवू शकेल, अशी आशा हाफीजने व्यक्त केली आहे. कोरोनामुळे सदर स्पर्धा लांबणीवर टाकली जाईल असा अंदाज असून ही स्पर्धा कदाचीत माझ्या क्रिकेट कारकीर्दीतील शेवटची राहील, असे मोहम्मद हाफीजने म्हटले आहे. 2018 साली मोहम्मद हाफीजने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्याने आपला सहभाग दर्शविला होता. गेल्या जानेवारीत पाकमध्ये झालेल्या बांगलादेश विरूद्धच्या मालिकेसाठी पाक संघात मोहम्मद हाफीजचे पुनरागमन झाले होते. तसेच येत्या ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान इंग्लंडच्या दौऱयासाठी मोहम्मद हाफीजची पाक संघात निवड करण्यात आली आहे.

Related Stories

विनेश फोगटला सुवर्णपदकासह अग्रस्थान

Patil_p

माजी रणजी क्रिकेटपटू ध्रुव केळवकर यांचे निधन

Abhijeet Shinde

राजेश कुमार यांची ‘द्रोणाचार्य’साठी शिफारस

Patil_p

रियल माद्रीदचे दोन फुटबॉलपटू कोरोना बाधित

Patil_p

चेन्नाई सुपरस्टार उपांत्य फेरीत

Patil_p

पहिला वनडे सामना लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!