तरुण भारत

ऑस्ट्रेलियातील ए लीग स्पर्धा 16 जुलैपासून

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

कोरोना महामारीमुळे ऑस्ट्रेलियातील सर्व क्रीडास्पर्धा स्थगित किंवा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. ऑस्ट्रेलियात क्रीडा हालचालींना पुन्हा प्रारंभ करण्याचा विचार चालू आहे. तब्बल चार महिने ऑस्ट्रेलियात फुटबॉल सामने स्थगित करण्यात आले होते. आता ऑस्ट्रेलियात ए लीग फुटबॉल स्पर्धेला 16 जुलैपासून पुन्हा प्रारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा ऑस्ट्रेलियन फुटबॉल फेडरेशनने केली आहे.

Advertisements

16 जुलै रोजी या स्पर्धेला प्रारंभ झाल्यानंतर मेलबोर्न व्हिक्टरी आणि वेस्टर्न युनायटेड यांच्यातील सामना मेलबोर्नच्या स्टेडियमवर खेळविला जाईल. त्यानंतर 17 जुलैला या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीवर असलेला सिडनी एफसीचा सामना वेलिंग्टन फिनिक्स बरोबर होणार आहे. गेल्या मार्चमध्ये ऑस्ट्रेलियन ए लीग स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. या स्पर्धेतील उर्वरित सहा फेऱयातील सामने तसेच प्ले ऑफ गटातील सामने बाकी आहेत. सदर स्पर्धा 31 ऑगस्टपर्यंत संपविण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन फुटबॉल फेडरेशन घेतला आहे.s

Related Stories

सहा आठवडय़ांच्या प्रशिक्षण शिबिरात धोनी सहभागी होणार का?

Patil_p

अबु धाबी टी-10 लीग- बांगला टायगर्सचा दुसरा विजय

Patil_p

मॅक्सवेल-एबीडीची ‘ट्रिक’, आरसीबीची ‘हॅट्ट्रिक’!

Patil_p

अंतिम फेरी गाठत अन्शू मलिकचा नवा इतिहास

Amit Kulkarni

बार्सिलोनाच्या फुटबॉलपटूला दुखापत

Patil_p

वर्ल्ड ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा आजपासून

Patil_p
error: Content is protected !!