तरुण भारत

महाराष्ट्रातून आलेल्या तिघांना कोरोनाची बाधा

जिल्हय़ातील कोरोनाबाधितांचा आकडा 307 वर

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

महाराष्ट्रातून आलेल्या आणखी तिघांना कोरोनाची लागण झाली असून जिल्हय़ाचा आकडा आता 307 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रातून आलेल्या 21 वषीय महिलेला तसेच 52 वषीय इसमाला आणि 6 वषीय बालकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल मंगळवारी जिल्हा हेल्थ बुलेटिनमधून देण्यात आला आहे. यामुळे परराज्यांतून येणाऱयांना कोरोनाची अधिक लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मंगळवारी कडोली, एकसंबा, कागवाड येथील तिघांना कोरोनाची बाधा झाली आहे.

मंगळवारी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. याचबरोबर 9 जण कोरोनामुक्तही झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. कोरोनामुक्त होणाऱयांचा आकडाही वाढत चालला असून परराज्यांतून येणाऱयांनाच कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत असल्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.  मंगळवारी राज्यात 317 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्याचा आकडा 7 हजार 530 वर पोहोचला आहे.

जिल्हय़ातील 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. हुक्केरी तालुक्मयातील 5 जणांचा समावेश तर बेळगाव तालुक्मयातील 4 जण कोरोनामुक्त झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. रुग्ण क्रमांक 5410, 4511, 5412, 5419, 5497, 5393, 5394, 5399, 9390 हे बरे झाले आहेत. बरे होण्याची संख्या वाढली असली तरी परराज्यांतून येणाऱयांना कोरोनाची बाधा अधिक होत आहे. त्यामुळे परराज्यातून येणाऱया व्यक्तींना क्वारंटाईनमध्ये ठेवणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.

 आतापर्यंत 256 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 52 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

Related Stories

फुलांची उधळण करत उद्या खासबाग येथे होणार रंगपंचमी

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात गुरूवारी 232 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Patil_p

हिंडाल्कोनजीक दिवसाही पथदीप सुरूच

Amit Kulkarni

नवहिंद सोसायटीच्या चेअरमनपदी उदय जाधव

Patil_p

वर्षभरानंतर धावणार म्हैसूर-बेळगाव रेल्वे

Amit Kulkarni

मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंड्सच्या 24 व्या शोरूमचा शुभारंभ

Patil_p
error: Content is protected !!