तरुण भारत

तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी

वार्ताहर/ किणये

मंगळवारी तालुक्याच्या सर्वच भागात दमदार पाऊस झाला. संततधार पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून शेत शिवारात पाणी साचले आहे. त्यामुळे आता खरीप हंगामाला जोर येणार आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.

Advertisements

मंगळवारी सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसू लागल्या. सकाळी नऊनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. काही भागातील रस्त्यांवर पाणी आले होते. पाऊस होत असल्यामुळे शेतकऱयांना खरीप हंगाम साधता येणार आहे. दि. 7 जूनपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला. मात्र मृग नक्षत्राला प्रारंभ होऊनही पाऊस झाला. पण मंगळवारी पावसाने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले. यामुळे अनेकांची तारांबळ उडाली.

सध्या शिवारात कोळपणी, रताळी लागवड, भुईमूग पेरणी आदी कामे सुरू आहेत. या पावसाचा रोप लागवडीसाठी शेतात चिखल करण्यासाठी उपयोग होणार असल्याचे मत काही शेतकऱयांनी व्यक्त केले आहे. पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून आल्यामुळे पिरनवाडी, मच्छे, बेळवट्टी, कर्ले, बेळगुंदी, सोनोली या रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांना बरीच कसरत करावी लागली..

Related Stories

खडा पहारासाठी शिवप्रतिष्ठानची पहिली यादी तयार

Omkar B

ऐन भात कापणीच्यावेळी पाऊस पिकांचे नुकसान होण्याची शक्यता

Patil_p

पुनर्परीक्षेसाठी 12 हजार 561 अर्ज

Patil_p

बार असोसिएशन अध्यक्षपदाला स्थगिती

Patil_p

महिला सबलीकरणासाठी हवी ग्रामसभा

Amit Kulkarni

विश्व हिंदू परिषद-बजरंग दलतर्फे विजयोत्सव

Omkar B
error: Content is protected !!