तरुण भारत

झारखंडमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 51.33 टक्के

ऑनलाईन टीम / रांची : 


देशात कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत आहे. त्यातच झारखंड मधून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. झारखंडमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 51.33 टक्के आहे, अशी माहिती झारखंडचे आरोग्यमंत्री डॉ. नितीन मदन कुलकर्णी यांनी दिली. 

Advertisements


पुढे ते म्हणाले,  कोरोना व्हायरस आणि पावसाळ्यात होणारे आजार यामुळे वाढणारा संसर्ग जाणून घेण्यासाठी 18 जून पासून राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य सर्वेक्षणाची सुरुवात केली जाईल. 


पुढे ते म्हणाले, राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 1793 रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक हजार रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 784 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 51.33 टक्के आहे. 


18 जून पासून केल्या जाणाऱ्या आरोग्य सर्वेक्षणाच्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची संपूर्ण तपासणी केली जाईल. तसेच पावसाळ्यात होणारे विविध रोग आणि  डेंग्यू सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी औषधांची फवारणी देखील करण्यात येणार आहे. असेही कुलकर्णी यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Related Stories

पोलीस स्थानकात उरकला हळदीचा विधी

Patil_p

काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Abhijeet Shinde

पदवी विद्यार्थ्यांना जुलैमध्ये लस

Patil_p

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा : राज ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र

Rohan_P

तामिळनाडूमध्ये गेल्या 24 तासात 4496 नवे कोरोना रुग्ण; 68 मृत्यू

Rohan_P

कॅलिफोर्निया : जंगलातील आगीत 2 दशलक्ष हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक

datta jadhav
error: Content is protected !!