तरुण भारत

चालत्या गाडीतून गुटखा थुंकणे पडले महागात; भरावा लागला 500 रुपये दंड

ऑनलाईन टीम / आग्रा : 


देशात सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यातच आग्र्यातील एका निवासी व्यापाऱ्याला गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणे चांगलेच महागात पडले आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, आग्र्यातील एका निवासी व्यापारी चालत्या गाडीतून गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकला, त्यावेळी पोलिसांनी त्याच्या या कृत्याचा फोटो काढून त्याच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला. ही घटना पालीवाल पार्कमध्ये मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. त्यावेळी पोलिसांची टीम याठिकाणी चेकिंग करत होती. 


अजय उपाध्याय असे या व्यापाराचे नाव आहे. अजय हे मंगळवारी सकाळी पालीवाल पार्क मधून  जात होते, त्यावेळी त्यांनी आपल्या गाडीची काच खाली करून गुटखा थुंकू लागले. त्यावेळी हरिपर्वत पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक अजय कौशल आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत चेकिंग करत होते. त्यावेळी त्यांनी ही कारवाई केली होती. 


याबाबत अधिक माहिती देताना अजय कौशल म्हणाले, कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर थुंकण्यास मनाई आहे. त्यामुळे अजय उपाध्याय यांच्याकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच यापुढे सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याची ताकीद देण्यात आली आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले. 

Related Stories

अफगाणच्या संकटावर दाखविली एकजूट

Patil_p

भारत-अमेरिका भागिदारी कोरोनावर करणार मात

Patil_p

कोरोना : ‘यांनी’ घेतला ‘स्पुटनिक V’ चा पहिला डोस

Rohan_P

फ्रान्स संरक्षणमंत्री भारत दौऱयावर येणार

Patil_p

सुरेश रैनाच्या काकांची हत्या; कुटुंबातील चार जखमी

datta jadhav

LIC चा IPO लवकरच बाजारात

datta jadhav
error: Content is protected !!