तरुण भारत

सुरुपलीचे जॅकवेल जमिनदोस्त; ३० लाखाचे नुकसान

पिण्याचा पाणी पुरवठ्यावर होणार परिणाम

प्रतिनिधी / मुरगूड

Advertisements

गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल चाळीस वर्षे सुरुपली (ता.कागल) गावाला पिण्याचा पाणी पुरवठा करणारे वेदगंगा नदीवरील जॅकवेल जमिनदोस्त झाले आहे. यामध्ये पाणी उपसा करणाऱ्या दोन मोटरी, केबल, पाईप गाडले गेले आहे. हे साहित्य व कोसळलेले जॅकवेल यामुळे सुमारे ३० लाखाचे नुकसान झाले आहे. नवीन व कोसळेल्या अशा दोन्ही जॅकवेलमधून गावाला पाणी पुरवठा केला जात होता. कोसळेल्या जॅकवेलमुळे गावाला पुरेशा पिण्याच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

सुरुपली (ता..कागल) गावासाठी पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी १९८० मध्ये वेदगंगा नदीवर जॅकवेल बांधण्यात आले होते. जमिनीत सुमारे ७५ फूट तर जमीनीच्या वर सुमारे ५० फूट उंच मजबूत दगडी बांधकामात हे जॅकवले उभारले गेले होते. गेले दोन दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे हे जॅकवेल जमिनदोस्त झाले आहे. यामध्ये साडेसात हॉर्सपॉवरच्या दोन पाणी उपसा करणाऱ्या मोटरी व त्यांच्या केबली, लोखंडी पाईप गाडल्या गेल्या आहेत तसेच कोसळलेले जॅकवेल असे सुमारे ३०लाखाचे नुकसान झाले आहे. पर्यायी जॅकवेल गेल्या पाच वर्षापूर्वी नव्याने बांधण्यात आले आहे. नव्या व जुन्या अशा दोन्ही जॅकवलेमधून गावाला पिण्याचा पाणी पुरवठा केला जात होता. मात्र मोठ्या प्रमाणात कोसळेल्या जॅकवेलमधूनच गावाला पाणी मिळत होते.विशेष म्हणजे कोसळेल्या जॅकवेलमध्ये थेट नदीत बांधण्यात आलेल्या जॅकवेलमधून पाणी येत असल्याने उन्हाळ्यात गावाला कोणतेही पाणीटंचाई जाणवत नव्हती. हे जॅकवेल जमिनदोस्त झाल्याने गावाच्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे त्यामुळे शासनाने कोसळलेले जकवेल दुरुस्त करून द्यावे अशी मागणी होत आहे.

Related Stories

पानिपतमध्ये उद्या मराठा शौर्य दिन

Sumit Tambekar

“कुंभी कासारी” ३०४५ रुपये एकरकमी एफआरपी देणार

Abhijeet Shinde

पिंपळगावमध्ये माऊली गिफ्ट शॉपीस आग – सुमारे एक लाखाचे नुकसान

Abhijeet Shinde

कोल्हापूर : राजापूरच्या वृद्धावर कोल्हापुरात दफनविधी

Abhijeet Shinde

पवार-गडकरींची पुण्यात भेट

Abhijeet Shinde

लाँकडाऊन मुळे रखडलेल्या कामांना मिळणार गती

Patil_p
error: Content is protected !!