तरुण भारत

मुसळधार पावसाने जिल्हय़ाला झोडपले

तीन दिवस सोसाटय़ाच्या वाऱयांसह पावसाची शक्यता

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

मंगळवार सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्हय़ाला चांगलेच झोडपून काढले आहे. विशेषतः रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, गुहागर या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. नद्यांच्या पाणीपात्रात वाढ झाली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या, भराव खचण्याच्या घटना घडल्या. दरम्यान, तीन दिवस कोकणात सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ‘रेड ते ऑरेंज’ अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

   जिल्हय़ात मान्सून दाखल झाल्यानंतर मंगळवार सायंकाळपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळाला. बुधवारी दुपारपर्यंत रत्नागिरीत हा जोर कायम होता. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आणि माती आल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे. राजापूरजवळ कोदवली येथे महामार्गावर भलीमोठी दरड कोसळली, यातून दोन वाहने सुदैवाने बचावली. संगमेश्वरात शास्त्री पुलाजवळ दरड कोसळल्याने 3 घरांना धोका निर्माण झाल आहे. सांगवे येथे पुलाचा भराव खचल्याने पुल धोकादायक बनला आहे. पुढील दोन दिवस मोठय़ा पावसाचा इशारा देण्यात आला असून पावसाचा जोर वाढल्यास जिल्हय़ात पुरस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, गरज असेल तर घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

रत्नागिरीतील रस्त्यांना तळय़ाचे स्वरूप  

  मंगळवारपासून सुरू असलेल्या पावसाने रत्नागिरी शहर तुंबल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाळय़ासाठी सज्ज असल्याचा व गटार-नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा रत्नागिरी नगराध्यक्ष बंडय़ा साळवी यांनी केलेल्या दाव्यातील फोलफणा उघड झाला आहे. जोरदार पावसामुळे गटारांचे पाणी रस्त्यावरून वाहण्याचे व तुंबण्याचे प्रकार घडले. शिवाजी स्टेडीयममागील रस्ता, आरोग्य मंदिर ते पावरहाऊस ते गजानन महाराज मंदीर रस्त्यासह अनेक रस्त्यांना अक्षरशः तळय़ांचे स्वरूप आले होते. गटारे साफ केल्याचा व रस्त्यांची डागडुजी केल्याचा दावा करणाऱया नगर परिषदेचा कारभारावर त्यामुळे टीकेचे झोड उठत आहे. संगमेश्वरात दरडींचे विघ्न

संगमेश्वरः संगमेश्वर शास्त्राrपुलाजवळील घरांलगतची दरड मुसळधार पावसामुळे कोसळल्याने 3 घरांना धोका निर्माण झाला असून तेथील कुटुंबियांना सुरळीत स्थळी हलवण्यात आले आहे. माभळे येथे दरडी कोसळून गटाराचे पाणी थेट महामार्गावर आल्याने वाहनचालकांना गाडी चालवणे धोकादायक होत आहे. गटारांची कामे व्यवस्थित न केल्यामुळे माभळे, कुरधुंडा, तुरळ आदी ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. कोसुंब येथेही धोकादायक दरडी कोसळू लागल्या असून सांगवे पुलाचा भराव खचल्याने पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे.

महामार्गावर भली मोठी दरड       

राजापूरः तालुक्यात मंगळवारपासून कोसळणाऱया मुसळधार पावसामध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील कोदवली येथे महाकाली देवस्थानलगतची भली मोठी दरड हायवेवर कोसळली. याचवेळी महामार्गावरून जात असणारी दोन वाहने सुदैवाने बालंबाल बचावली. 

गेले दोन दिवस मुसळधार पावसाने राजापूर तालुक्याला झोडपून काढले.    मुंबई-गोवा महामार्गावर शहरानजीक कोदवली (डुगित) महाकाली देवस्थानाजवळील भली मोठी दरड हायवेवर कोसळली. याचदरम्यान दोन वाहने महामार्गावरून जात होती. वाहन पुढे गेल्यानंतर काही क्षणाच्या अंतराने दरड कोसळल्याने सुदैवाने दोन्ही वाहने बचावली. या बाबतची माहिती मिळताच राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्यासह, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता ओटवणेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अभिजित गुरव, तसेच कुमावत, कांबळे व अरविंद लांजेकर उपस्थित होते.

रेड ते ऑरेंज ऍलर्ट

अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण होऊन वाऱयाचा वेग वाढलेला आहे. त्यामुळे गुरुवार 18 जूनपर्यंत धो धो पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. 18 ते 20 जूनच्या काळात कोकण व गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून रेड ते ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

बुधवारी सकाळपर्यंत झालेल्या 24 तासातील पर्जन्यमान(मिमि मध्ये):

मंडणगड- 9, दापोली-20, खेड- 24, गुहागर- 53, चिपळूण-62, संगमेश्वर-147, रत्नागिरी- 30, लांजा-34, राजापूर-82 इतके पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. अशाप्रकारे जिल्हय़ात एकूण 51.22 सरासरी इतके पर्जन्यमान झालेले आहे.

Related Stories

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला वेदांत कंपनीतर्फे अत्याधुनिक उपकरणे

Ganeshprasad Gogate

मुंबई विद्यापीठ उपकेंद्राला धनंजय किर यांचे नामकरण

Patil_p

निर्भिड व्यापारी महासंघ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Patil_p

औद्यागिक दर्जाच्या विशेष सवलती आदरातिथ्य क्षेत्राला

NIKHIL_N

मंडणगड पंचायत समिती सभापतीपदी स्नेहल सकपाळ

Abhijeet Shinde

ॲड. संग्राम देसाई यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या उपाध्यक्षपदी निवड

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!