तरुण भारत

डोक्यात फरशी घालून मुलाचा खुन

देवराष्ट्रे / वार्ताहर

मोहित्यांचे वडगाव ता.कडेगाव येथील संतोष शंकर शिंदे (वय ३५) याच्या डोक्यात फरशी घालून त्याच्या वडिलांनी त्याला जखमी केले होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे 2 वाजता संतोष शिंदे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी शंकर रामचंद्र शिंदेवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी संतोष शिंदे हा वारंवार त्याचे वडील शंकर शिंदे यांच्याकडे घर व शेत जमिनीची वाटणी मागत होता वाटणीवरून त्यांच्यात दररोज वाद होत होते. रविवारी रात्री ९ वाजता संतोष दारु पिऊन आरोपी शंकर शिंदे यांच्या घरासमोर आला व घर,शेत जमिनीच्या वाटणी देण्याच्या कारणावरून आई वडिलांना शिवीगाळ करू लागला. त्यावेळी वडील शंकर व मुलगा संतोष यांच्यात वादावादी झाली.

Advertisements

यावेळी संतोष शिंदे याने वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली यामुळे रागाच्या भरात वडील शंकर यांनी संतोषच्या डोक्यात फरशी घातली यामध्ये संतोष गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्याची प्रकृती चिंताजनक होती. उपचार सुरु असतानाच बुधवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. आरोपी शंकर शिंदे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी करीत आहेत.

Related Stories

सांगली : दरीबडचीतील ‘त्या’ तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट, तिघे ताब्यात

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात पाच जण कोरोना बाधित

Abhijeet Shinde

फडणवीस,चंद्रकांत पाटील पडळकरांचे बोलवते धनी

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांनी नरेगा अंतर्गत फळबाग लागवड करावी

Abhijeet Shinde

बोंडारवाडी धरणाचे काम मार्गी लागण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील : अधिक्षक अभियंता प्रकाश मिसाळ

Patil_p

सांगली : महात्मा फुले योजना कृष्णेच्या डोहात बुडविली : सदाभाऊ खोत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!