तरुण भारत

स्टेट बँकेने एसबीआय लाईफची 2.1 टक्के हिस्सेदारी विकली

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय स्टेट बँकने दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँक लाईफ इन्शुयन्स कंपनीमधील 2.1 टक्के हिस्सेदारीची विक्री केली असल्याचे म्हटले आहे. समभाग नियमाचे पालन करुन ही हिस्सेदारी विकली आहे.

Advertisements

12 जून आणि 15 जून 2020 रोजी या विक्री संदर्भात चर्चा करुन विक्रीला हिरवा कंदील दिला परंतु या व्यवहारासाठी किती रुपयांची गुंतवणूक केली आहे, याचा तपशील मात्र दिला नसल्याचे शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमधून स्पष्ट केले आहे. मात्र स्टेट बँकेने एकूण 2,10,00,000 इक्विटी समभाग विक्रीची माहिती दिली आहे.

कमीत कमी 725 रुपये समभाग मूल्याच्या आधारे 2.1 कोटी समभागाच्या विक्रीच्या आधारे एसबीआयचे 1,522.50 कोटी रुपये जोडले जाण्याचा अंदाज आहे. या समभागाचे अंकित मूल्य दहा रुपये आहे. यामध्ये पहिल्यांदा 11 जून रोजी स्टेट बँकेने सूचित केले होते की एसबीआय विक्रीसाठी कमीत कमी मूल्य 725 रुपये प्रति समभाग निश्चित केले आहे.

Related Stories

पीएफ व्याजदर घटणार ?

Patil_p

ऍपलचे ऑनलाइन स्टोअर भारतात लवकरच

Patil_p

ऍक्सिस म्युच्युअल फंडमध्ये व्हॉटसऍपच्या आधारे गुंतवणूक

Patil_p

जानेवारी 15 पर्यंत साखरेचे उत्पादन 142 लाख टन

Patil_p

चलनवृद्धी नियंत्रणाचे यांत्रिक धोरण

tarunbharat

बीएस-6 वाहनांच्या नंबर प्लेटवर हिरवी पट्टी!

Patil_p
error: Content is protected !!