तरुण भारत

अन सातारच्या त्या जोडप्याने आपल्या बाळाचे नाव ठेवले ’शंभूराज’

प्रतिनिधी/ सातारा

नावात काय आहे हे जगप्रसिद्ध नाटककार शेक्सपिअर यांनी आपल्या नाटकातून अनेकदा सांगून गेला आहे.हिंदी चित्रपटात अनेक डायलॉग हे हिरोच्या नावावरून हिट होत असतात.मात्र, राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई हे जसे डॅशिंग आहेत तसेच ते सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला लगेच धावून जातात.भले तो मतदार संघातला का नसेना. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर वेगवेळी संकट आली आहेत.त्यातच सातारा येथील गर्भवती असलेल्या एका महिलेला कोरोनाच्या संकट काळात गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी मदतीचा हात पुढे केला.या उपकाराची आठवण आयुष्यभर रहावी म्हणून  सातारा येथील दाम्पत्याने आपल्या बाळाचे नाव शंभूराज ठेवले आहे.

Advertisements

याबाबत मिळालेली माहिती अशी की सातारा येथे वास्तव्यास असलेल्या रणजित चव्हाण यांच्या गर्भवती पत्नीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.योग्य उपचारासाठी त्यांना नायर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता.मुंबईत अगोदरच रुग्णांची संख्या वाढते आहे.आधीच विदारक चित्र दिसत असताना रणजित चव्हाण यांनी थेट मंत्री शंभूराज देसाई यांना फोन केला.घटनेचे गांभीर्य घेऊन मंत्री शंभूराज देसाई यांनी नायर रुग्णालयात संपर्क करून स्वतः त्याचा पाठपुरावा केला.रणजित यांच्या पत्नीला नायर येथे दाखल करून घेत बेड उपलब्ध झाला.मंत्री देसाई यांनी कामातून वेळ काढत रणजित यांच्याशी आणि नायर रुग्णालयाशी संपर्क ठेवून होते.14 मे रोजी रणजित यांना पुत्र झाला.बाळ व बाळंतीण सुखरूप आहेत.तीन दिवसांनी दि.17 रोजी त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यामुळे संपूर्ण चव्हाण कुटूंबाला कोरोन टाइन व्हावे लागले होते.पण या दोघांनीही कोरोनावर यशस्वी मात केली.यानंतर रणजित चव्हाण यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना पत्र लिहून आभार मानले.तसेच आठवण आयुष्यभर रहावी म्हणून बाळाचे नाव शंभूराज ठेवत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

Related Stories

वीज बिलाच्या वसुलीची साखर आयुक्तांना ‘सुपारी’

datta jadhav

निवड चाचणीच्या आखाडय़ात कोल्हापूरच्या पोरी ठरल्या भारी!

Patil_p

जम्बो हॉस्पिटलचे शुक्रवारी उद्घाटन

Omkar B

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 28 रुग्ण

datta jadhav

सोमय्यांवर दगड पडला तर महागात पडेल!

Abhijeet Shinde

बंडातात्या कराडकर करवडीत स्थानबद्ध

Patil_p
error: Content is protected !!