तरुण भारत

आज बारावीची इंग्रजी विषयाची परीक्षा

वार्ताहर/ चिकोडी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मार्चमध्ये अचानकपणे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पी. यु. सी. द्वितीय (बारावी) ची इंग्रजी विषयाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा होणार की नाही? याची चर्चा अडीच महिन्यापासून रंगली होती. अखेर आज गुरुवार दि. 18 रोजी ही परीक्षा होणार असून यासाठी पदवीपूर्व शिक्षण खात्याने कंबर कसली आहे. चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात 26 हजार 559 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये इतर जिल्हय़ातील 829 व परराज्यातील 29 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवीपूर्व शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेमध्ये आमुलाग्र असे बदल केले आहेत. शिवाय विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार त्यांना ज्या-त्या जिल्हय़ात वास्तव्याच्या ठिकाणापासून नजीकच्या केंद्रावर परीक्षा देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. केंद्रात येण्यापूर्वी परीक्षार्थीची आरोग्य खात्याद्वारे तपासणी करण्याबरोबरच त्यांना सॅनिटायझर देऊन केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय ज्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचा संशय असेल त्यांना वेगळय़ा खोलीमध्ये परीक्षा देण्याची सोय करण्यात आली आहे. शिवाय केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचाऱयांना मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.

सहाय्यवाणी कक्षाची स्थापना

परीक्षार्थिंना कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी सहाय्यवाणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी 9945385983, 8951458846, 8197180193, 9741581136 व 8861915711 यावर संपर्क साधल्यास त्यांना सहाय्य मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता परीक्षा द्यावी, असे आवाहन शिक्षण उपसंचालकांनी केले आहे.

249 खोल्या वाढल्या

चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ात परजिल्हा व परराज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेत परीक्षा केंद्रांची संख्या 45 वरुन 49 इतकी वाढविण्यात आली आहे. याशिवाय पूर्वी 886 खोल्या निश्चित होत्या. त्याऐवजी आता 1135 खोल्यांमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली असून सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक खोलीमध्ये 24 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे 249 परीक्षा खोल्या वाढल्या असल्याची माहिती चिकोडीचे डीडीपीयू संजय कांबळे यांनी सांगितले.

Related Stories

अधिकाऱयांनी पूरनियंत्रणासाठी सज्ज रहावे

Patil_p

अर्जुनराव गौंडाडकर यांचे निधन

Amit Kulkarni

चंद्रशेखर इंडी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Patil_p

बेळगाव-चोर्ला रस्त्याची दुरुस्ती करा

Amit Kulkarni

रोटरॅक्ट क्लब ऑफ केएलई सिबाल्कचा अधिकारग्रहण सोहळा

Patil_p

लेकक्हय़ू हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स डे साजरा

Patil_p
error: Content is protected !!