तरुण भारत

बेकायदेशीर वाहतूक, कोटीची रक्कम जप्त

वार्ताहर/ कागवाड

कारमधून बेकायदेशीररित्या रोकड घेऊन जाणाऱया तिघांवर अथणीचे सीपीआय शंकरगौडा बसगौडर, कागवाडचे उपनिरीक्षक हणमंत धर्मट्टी यांनी कारवाई करीत तिघांकडून 1 कोटी 8 लाख 54 हजार 150 रुपयांची रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी कागवाड पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Advertisements

अधिक माहिती अशी की, मंगळवारी पहाटे 3.30 च्या दरम्यान कागवाडकडून अथणीकडे जाणारी कार शेडबाळ स्टेशनजवळ थांबली होती. यावेळी गस्तीवर असणारे सीपीआय बसगौडर व फौजदार धर्मट्टी यांनी या कारजवळ जात कारमधील व्यक्तींची चौकशी केली. यावेळी कारमध्ये अभयसिंह उदयसिंह गायकवाड (वय 35), अक्षय बाळासाहेब देसाई (वय 29), आशुतोष बजरंग खिलारे (वय 23, तिघेही रा. हुपरी, जि. कोल्हापूर) हे आढळून आले. वरील तिघेही सध्या बेळगावातील शहापूर येथील आचार्य गल्लीमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे काम करतात. वरील तिघांकडे चौकशी केली असता ते तिघेही गोंधळून गेले. यावेळी वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये सदर कोटय़वधी रुपये आढळून आले. ही रक्कम शहापूर येथील बापू शिंदे यांची असल्याचे तिघांनी सांगितले. मात्र याबाबत कोणताच पुरावा ते देवू न शकल्याने पोलिसांनी गुन्हा नोंद करुन पुढील चौकशी चालविली आहे.

Related Stories

रामदुर्ग तालुक्यात 1383 उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद

Patil_p

55 पोलीस उपअधिक्षकांच्या बदल्या

Rohan_P

रविवारपेठ खुली पण गर्दीमुळे खावा लागला प्रसाद

Patil_p

पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला

Patil_p

गुरुवारपेठ टिळकवाडी येथे रस्त्यावर टाकला जातोय कचरा

Amit Kulkarni

खानापूर तालक्यात जि. पं.अंतर्गत येणाऱया विकासकामांसाठी निधी मंजुरीचे आश्वासन

Omkar B
error: Content is protected !!