तरुण भारत

नितीन गडकरी यांची शनिवारी ऑनलाईन सभा

गोव्यातील एक लाख लोकांनी पाहण्याची व्यवस्था

प्रतिनिधी / पणजी

मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त गोवा प्रदेश भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ऑनलाईन सभा आयोजित केली असून ती शनिवार 20 जून रोजी सायंकाळी 6.30 वा. होणार आहे. गडकरी हे दिल्ली येथून संबोधित करणार आहेत. त्यांची सभा गोव्यातील विविध ठिकाणाहून 1 लाखांपेक्षा अधिक लोक ऐकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्स, यु टय़ुब, फेसबूक, व्हॉटसऍप अशा विविध  प्रकारच्या सोशल माध्यमातून भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक, हितचिंतक त्या सभेत भाग घेणार आहेत.

गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपरोक्त माहिती देऊन सांगितले की, कोरोनाचे सावट असल्याने गर्दीचा कार्यक्रम करता येत नाही म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ही सभा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षभरात जे काही साध्य केले त्यावर गडकरी प्रकाशझोत टाकणार आहेत.

म्हापसा येथील भाजप कार्यालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, बाबू आजगावकर, खासदार विनय तेंडुलकर व तानावडे उपस्थित राहून सभेत सहभागी होतील. आमदार तसेच भाजप मंडळ अध्यक्ष पदाधिकारी आपापल्या मतदारसंघातून सभेत भाग घेतील.

रविवार दि. 21 जून रोजी योग दिन असून तो भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे आपापल्या घरी साजरा करणार असून त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल माध्यमातून प्रसारित करणार आहेत. मंगळवार दि. 23 जून हा शामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिन या नात्याने साजरा केला जाणार असून भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र आर्लेकर हे त्या दिवशी सायंकाळी 5 वा. पणजी भाजप कार्यालयातून मुखर्जींवर भाषण देणार आहेत. ते ऑनलाईन पद्धतीने भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी पहातील, आणि त्यात सहभागी होतील.

Related Stories

तोतया मंत्री सुनिल सिंग व त्याच्या समुहावर कडक कारवाई करावी

Patil_p

पणजीतील बेवारस वाहने मनपाकडून जप्त

Patil_p

परराज्यांतून मासे घेऊन येणाऱयांस कोविड प्रमाणपत्राची सक्ती करावी

Patil_p

ओपा-खांडेपार येथे अडकलेल्या मगराची सुखरूप सुटका

Omkar B

वास्को रेल्वे स्थानकासमोर आता हायमास्ट ध्वजस्तंभ

Patil_p

ईस्ट बंगालचा जमशेदपूरवर धक्कादायक विजय

Amit Kulkarni
error: Content is protected !!