तरुण भारत

भारतविरोधी विधेयक नेपाळमध्ये संमत

वृत्तसंस्था/ काठमांडू :

नेपाळच्या राष्ट्रीय सभेत (संसदेचे वरिष्ठ सभागृह) 3 भारतीय भूभाग कालापानी, लिंपियाधूरा आणि लिपुलेखला स्वतःच्या हद्दीत दर्शविणाऱया वादग्रस्त नकाशाशी संबधित विधेयक संमते झाले आहे. हे विधेयक राज्यघटनेत दुरुस्ती करण्यासाठी मांडण्यात आले होते. नेपाळच्या कायदामंत्री डॉ. शिवमाया तुम्बाड यांनी हे विधेयक सादर केले होते.

Advertisements

नेपाळने एकूण 395 चौरस किलोमीटरच्या भारतीय भूभागावर दावा सांगणारा वादग्रस्त नकाशा प्रसिद्ध केला आहे. नेपाळच्या संसदेत हे विधेयक संमत झाल्यावर भारताच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आक्षेप नोंदविला होता. नेपाळचा दावा ऐतिहासिक वास्तव आणि पुराव्यांवर आधारित नाही. सीमा वादावर होणाऱया चर्चेच्या विद्यमान कराराचे हे उल्लंघन असल्याचे भारताने नेपाळला सुनावले आहे.

भारताने लिपुलेखपासून धारचूलापर्यंत रस्ता तयार केला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी 8 मे या रस्त्याचे उद्घाटन केले होते. या नव्या रस्त्यामुळे भारतीय भाविकांना आता कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये जावे लागणार नाही. नेपाळच्या सरकारने या रस्त्याला विरोध दर्शवित 18 मे रोजी नवा नकाशा प्रसिद्ध केला होता. नेपाळने अन्य कुणाच्या सांगण्यावरून ही आगळीक केल्याचे म्हणत भारतीय सैन्यप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी चीनच्या दिशेने इशारा केला होता.

Related Stories

पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Patil_p

कोरोनासंबंधी नवी मार्गदर्शक तत्त्वे घोषित

Omkar B

संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा मोठा विजय

Patil_p

लसीकरण धोरणाची झाडाझडती

Patil_p

…तर द्विपक्षीय संबंध बिघडतील भारताचा कॅनडाला इशारा

Patil_p

गाझियाबाद जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर

datta jadhav
error: Content is protected !!