तरुण भारत

10 नवे रूग्ण, बाधीत 459

प्रतिनिधी/ रत्नागिरी :

बुधवारी सायंकाळपासून 10 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 459 झाली आहे. गुरूवारी 9 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 343 झाली आहे. बरे होणाऱया रुग्णांचे प्रमाण 74.72 टक्के झाले आहे.

Advertisements

  बुधवारी कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडलेला कामथे येथील एका रुग्णास श्वसनाला त्रास  जाणवू लागल्याने पुन्हा ऍडमीट करण्यात आले. अहवाल निगेटिव्ह आल्याने यापुर्वी त्याला घरी सोडण्यात आले होते. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 459 इतकीच आहे. तथापि रुग्णालयात दाखल असणाऱया ऍक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मात्र आता 100 झाली आहे. आतापर्यंत  कोरोनामुळे 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

   गुरूवारी आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णामध्ये रत्नागिरी कोकणनगर येथील 2 तर  गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथील एकाचा समावेश असूनखेड तालुक्यातील पाच तर संगमेश्वरातील दोघांचा समावेश आहे. खेड तालुक्यात शिवतर, कर्टेल व खवटीतील प्रत्येकी 1, तळे कासारवाडी 2, तर संगमेश्वर तालुक्यातील साडवली व  कडवई येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. रत्नागिरीतील कोकण नगरमधील काही क्षेत्र कोरोना विषाणू बाधित घोषित करण्यात आले त्यामुळे कंटेन्मेंट झोनची संख्या 47 झाली आहे.

 बरे झालेल्या 9 रुग्णांमध्ये 5 जण जिल्हा कोव्हीड रुग्णालयातील तर 3 जण कोव्हीड केअर सेंटर समाज कल्याण व 1 जण कोव्हीड केअर सेंटर पेढांबे येथील आहे. 

239 अहवाल प्रलंबीत

      जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 7 हजार 974 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 7 हजार 7735 तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यातील 459 अहवाल पॉझीटीव्ह असून 7 हजार 256 अहवाल निगेटीव्ह आहेत. अजून 239 नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत असून 4 कोल्हापूर येथे, 162 मिरज आणि 73 अहवाल रत्नागिरी प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायास कोरोना!

गुहागर : कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱया गुहागर तालुक्यात चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपाई कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. मात्र या रूग्णाचा इतरांशी संपर्क न आल्याचे समजते.

नव्या रूग्णामुळे तालुक्यातील बाधीतांची संख्या 24 वर पोहचली आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून  20 जणांना डिस्चार्ज मिळाला होता. केवळ एकाच एकजण उपचाराखाली असतानाच आता नवा रूग्ण सापडला आहे. हा रूग्ण आरोग्य केंद्रात शिपाई असून 5 तारखेपासून तापाची लक्षणे असल्याने तो रजेवर  होता. ताप वाढल्याने 15 जून रोजी गुहागर ग्रामीण रूग्णालयात दाखल झाला. त्याचा अहवाल बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आला. त्याच्यासह पत्नी व 19 वर्षीय मुलाला वेळणेश्वर येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.  

29 मे रोजी वरवेली येथील कोरोनाबाधीत मृताच्या अंत्यसंस्कारावेळी या शिपायाला बाधा झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. जानवळे येथील वाडीला आयसोलेट क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

Related Stories

तारकर्लीच्या सुपुत्राची ‘रंगसेतु’ अभ्यासवृत्तीसाठी निवड

NIKHIL_N

चिपळुणातील बंदला प्रतिसाद कायम

Patil_p

संगमेश्वर तालुक्यात वीज पडून एक महिला ठार

Abhijeet Shinde

अपघात विमा कंपनीवर शेतकरी नाराज

NIKHIL_N

औषध विक्रीत 60 टक्क्यांनी घट

Patil_p

रत्नागिरी : ‘खेड नगरपरिषदेच्या हद्दीतील खोकेधारकांची चिंता विरोधकांनी करू नये’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!