तरुण भारत

चौपदरीकरणातील मातीचा भराव वाहून शेतात!

प्रतिनिधी / चिपळूण :

  गेले आठवडाभर सुरू असलेल्या पावसाचा जोर गुरूवारी सकाळपासून वाढल्याने तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर असुर्डे खिंडीत गटार न काढल्याने चौपदरीकरणातील मातीचा भराव वाहून शेतात घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे, तर मालदोली मार्गावर दरड कोसळल्याने या भागाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.

Advertisements

   बुधवारी दिवस आणि रात्री संततधार पाऊस असला तरी गुरूवारी सकाळी 10 वाजल्यानंतर शहरासह परिसरात चांगलाच जोर वाढला. खाडीपट्टय़ातील मालदोली मार्गावर बुधवारी रात्रीच्या सुमारास दरड दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. गुरूवारी सकाळी 8 वाजेपर्यतच 91.11 मि. मी. पावसाची नोंद झाली असून आतापर्यत 556 मि. मी पाऊस झाला आहे. असर्डेतील मातीचा भराव तसेच मालदोली मार्गावरील दरड वगळता पावसाने कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.

  असुर्डे खिंड येथे चौपदरीकरणाचे काम करताना पाईप मोरी असतानाही पाणी न वळवता सलग गटार ठेवल्याने तेथील मातीचा भराव पाण्याच्या लोंढय़ाने शेतात गेला आहे. गेले आठवडाभर त्याचा त्रास पाष्टेवाडीतील ग्रामस्थांना होत आहे. हा मातीचा भराव महामार्गावरून पाष्टेवाडीकडे जाणाऱया रस्त्यावरही गेल्याने रस्त्यावर दगड गोटय़ांसह चिखल साठला आहे. चेतक कंपनीच्या व्यवस्थापनाला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने राष्ट्रवादीचे कोकरे गण उपाध्यक्ष नीलेश खापरे यांनी आमदार शेखर निकम यांच्याशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानुसार गुरूवारी आमदार निकम यांनी ग्रामस्थांसमवेत या भागाची पहाणी केली. चेतक कंपनीच्या अधिकाऱयांना बोलावून उपाययोजनेच्या तसेच कार्यवाहीच्या सूचना केल्या.

Related Stories

गुहागरात वादळात 20 लाखाचे नुकसान

Patil_p

‘तौक्ते’चा रत्नागिरी किनारपट्टीला तडाखा

Patil_p

देयके 22 कोटीची, आले फक्त साडेतीन कोटी

NIKHIL_N

लॉकडाऊनमध्ये घरीच बनविली इलेक्ट्रिक दुचाकी

NIKHIL_N

तुझ्या नातीक सांग फोन करू नको म्हणान..!

NIKHIL_N

कोरोना चाचणीस नकार दिल्यास गुन्हा दाखल होणार

Patil_p
error: Content is protected !!