तरुण भारत

राज्यात गुरुवारी 49 नवे रुग्ण

प्रतिनिधी / पणजी

गोव्यात गुरुवारी नवीन 49 कोरोना रुग्ण सापडले असून 13 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. एकूण कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 596 वर पोहोचला असून आतापर्यंत 109 जण बरे झाले आहेत. ते धरून आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या 705 झाली आहे.

Advertisements

आरोग्य खात्यातर्फे ही माहिती व आकडेवारी देण्यात आली आहे. अद्याप 547 अहवाल यायचे बाकी असल्याने रुग्ण वाढण्याची भीती आहे. दरदिवशी रुग्ण वाढत असल्याचे समोर येत असून राज्यभरात जनमानसात त्याबाबत चिंता प्रकट होत आहे. दरदिवशी 35 ते 45 रुग्ण आढळून येत आहेत.

वास्कोच्या मांगोरहिल भागात सर्वांधिक 313 रुग्ण असून त्यांच्याशी संपर्कातून 181 आणखी रुग्ण मिळाले आहेत. न्यूवाडे 13, मोर्ले 19, बायणा 29, चिंबल 21, सडा 29 असे रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. त्याशिवाय रस्ता, रेल्वे व विमानमार्गे आलेले 70 प्रवासी कोरोनाबाधित सापडले आहेत.

विविध रेसिडन्सी, हॉटेलमध्ये मिळून 607 जणांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. आयसोलेशन वॉर्डात एकूण 12 जण असून 365 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 24 जण फॅसिलिटी क्वारंटाईनमध्ये आहेत. कोरोना संशयित म्हणून 9 जणांना दाखल करून घेण्यात आले आहे.

 गुरुवारी एकूण 1880 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी तपासण्यात आले. त्यातील 1284 निगेटिव्ह मिळाले तर 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 547 जणांचे अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे. मडगाव व बेती येथे मिळून 6 कोरोना रुग्ण आहेत. केपेमध्ये 4, कुडतरी येथे 10 रुग्ण सापडले आहेत. राय येथे 7 जण कोरोनाबाधित मिळाले आहेत.

गोव्यात 18 जून 2020 पर्यंत कोरोनाबाधित 705

आतापर्यंत बरे झालेले रुग्ण                         109

उपचार घेणारे रुग्ण                                  596

Related Stories

वाळपई नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदासाठी सेहझीन शेख,अनिल काटकर याचे उमेदवारी अर्ज

Amit Kulkarni

पुरस्कारप्राप्त शिक्षकांना यापुढे सेवेत मुदतवाढ नाही

Patil_p

डिचोलीत लॉकडाउनचा फिरत्या विपेत्यांकडून फज्जा.

Omkar B

गोमेकॉ इस्पितळतील व्यवस्था कोलमडली

Amit Kulkarni

फसवे अंदाजपत्रक मुख्यमंत्र्यांकडून सादर

Patil_p

शिवसेना राज्य सरचिटणीस मिलींद गावस यांचे निधन

Amit Kulkarni
error: Content is protected !!