तरुण भारत

हरियाणात कोरोनाबाधितांची संख्या 9, 218 वर 

ऑनलाईन टीम / हरियाणा : 


हरियाणा राज्यातील 19 जिल्ह्यात 386 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 604 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच हरियाणातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 9 हजार 218 वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवसात झालेल्या 4 मृत्यूंमुळे एकूण बळींची संख्या 134 वर पोहोचली आहे. काल झालेल्या मृतांमध्ये गुरुग्राममधील एक आणि फरिदाबाद मधील 3 जणांचा समावेश आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून 49.43 टक्के तर रुग्ण वाढण्याचे प्रमाण 4.69 टक्के आहे.

 
दरम्यान, गुरुवारी आढळलेल्या 386 रुग्णांपैकी गुरुग्राममध्ये सर्वाधिक 129, फरिदाबाद मध्ये 35, सोनपतमध्ये 51, झज्जर 9, अंबाला 25, पानिपत 2, पंचकुला 3, करनाल 12, यमुनानगर 9, फतेहाबाद 6, भिवानी 24, रोहतक 32, हिसार 6, रेवाडी 23 आणि कुरुक्षेत्र मधील 8 रुग्णांचा समावेश आहे. 

Related Stories

कोरोना कहर : महाराष्ट्रात 61,695 नवे बाधित; 349 मृत्यू

Rohan_P

कोरोना रोखण्यासाठी उपाययोजनांना वेग

Patil_p

देशात दिवसभरात आणखी तिघांचा मृत्यू

tarunbharat

गुजरात दंगलीतील 17 आरोपींना जामीन

prashant_c

सीआरपीएफच्या 25 डेप्युटी कमांडंटला पदोन्नती

datta jadhav

भारताचा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 26 क्रमांकांनी घसरला

datta jadhav
error: Content is protected !!