तरुण भारत

जगभरात 4.5 लाखांहून अधिक कोरोनाबळी

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरात आतापर्यंत 85 लाख 86 हजार 574 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4 लाख 56 हजार 468 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 45 लाख 35 हजार 951 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 35 लाख 94 हजार 155 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 54 हजार 576 केसेस गंभीर आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 22 लाख 63 हजार 749 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 20 हजार 688 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. ब्राझीलमध्ये 9 लाख 83 हजार 959 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 47 हजार 869 जणांचा मृत्यू झाला आहे. 

ब्राझीलनंतर इंग्लंडमध्ये कोरोनाबळींची संख्या जास्त आहे. इंग्लंडमध्ये 3 लाख 469 रुग्ण आढळले असून, 42 हजार 288 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलपाठोपाठ इटलीत मृतांची संख्या वाढत आहे. इटलीत आतापर्यंत 2 लाख 38 हजार 159 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 34 हजार 514 जण दगावले आहेत. 

Related Stories

ब्लॅक फंगसवरील इंजेक्शनच्या उत्पादन-आयातीला परवानगी

Patil_p

बौद्धिक विश्रांतीकरता 7 दिवसांची सुटी

Amit Kulkarni

अयोध्या दीपोत्सवाच्या विश्वविक्रमासाठी सज्ज

Abhijeet Shinde

चिंता वाढली : महाराष्ट्रात 3827 नवे कोरोना रुग्ण; 142 मृत्यू

Rohan_P

वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह, मॉस्कोला चाललेले विमान अर्ध्यातून पुन्हा दिल्लीला माघारी

Rohan_P

सद्यस्थितीत मास्कच बचावाचा सर्वोत्तम उपाय

Patil_p
error: Content is protected !!