तरुण भारत

राजकारण केल्याने मुख्यमंत्री झालो : उध्दव ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : 

शिवसेनेसोबत राजकारणाचा प्रयत्न झाला तो मोडीत काढण्यासाठी मी मुख्यमंत्री झालो. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. माझे स्वप्न नाही पंतप्रधान बनण्याचे, परंतु भविष्यात शिवसैनिकला पंतप्रधानही बनवणार, असा निर्धारही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचा आज 34 वा वर्धापन दिवस आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर हा शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 


पुढे ते म्हणाले, कधीही अन्याय सहन करू नका. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही डगमगणार नाही. घट्ट पाय रोवून उभा राहतो तो शिवसैनिक आणि हा मर्द शिवसैनिक माझ्यासोबत आहे शिवसेनेने आपली विचारधारा बदललेली नाही, असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


पुढे ते म्हणाले, आज कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. शिवसेनाच एक वादळ आहे. अशी कितीही वादळे आली तरी हे भगवे वादळ कायम राहणार आहे. शिवसेना हेच एक वादळ आहे, आम्हाला वादळाची परवा नाही.

ज्यावेळी कोरोनाचं संकट आलं तेव्हा कस्तुरबा आणि पुणे येथे फक्त दोनच लॅब होत्या, त्या आता आपण 100 लॅब केल्या आहेत. आपण लॅब आणखी वाढवणार आहोत. शिवसैनिकांनी देखील ह्या संकटाला रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी स्वतःची काळजी घेऊन दुसऱ्याला मदत करावी, असे आवाहन त्यांनी सर्व शिवसैनिकांना केले. 

Related Stories

चिंता वाढली : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 7862 नवे कोरोना रुग्ण; 226 मृत्यू

pradnya p

बिहार : घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

pradnya p

उत्तर प्रदेशात 16 ते 31 जुलैपर्यंत लागू नसणार संपूर्ण लॉक डाऊन

pradnya p

कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीसाठी आता मंत्रालयातील कर्मचारी

omkar B

महाराष्ट्रातही ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त

prashant_c

महाराष्ट्रात एका दिवसात 2598 जणांना कोरोनाची बाधा; एकूण संख्या 59 हजार 546 वर

pradnya p
error: Content is protected !!