तरुण भारत

अकोल्यात 15 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 1121

ऑनलाईन टीम / अकोला : 


अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अकोल्यात शुक्रवारी सकाळी  15 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1121 वर पोहोचली आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 216 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 201 अहवाल निगेटिव्ह तर 15 अहवाल पॉझिटिव्ह आले. तर आतापर्यंत एकूण 59 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. 


आज सापडलेल्या 15 रुग्णांमध्ये 8 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश आहे.  त्यात अकोटफैल येथील 5, बाळापूर 4, तर जेतवन नगर, भारती प्लॉट, कान्हेरी सरप, जुने शहर, मोठी उमरी, बार्शी टाकळ येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. 


दरम्यान, सध्या  जिल्ह्यातील एकूण 1121 रुग्णांपैकी 338 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आता पर्यंत 724 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Related Stories

भारतीय हद्दीत पुन्हा ड्रोनची घुसखोरी

Patil_p

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट

triratna

आसाम : मुख्यमंत्र्यांना हटवण्यासाठी भाजपच्या सात आमदारांचा दिल्लीत ठिय्या

datta jadhav

अनलॉकमधील निष्काळजीपणा चिंता वाढवेल

datta jadhav

महाराष्ट्र : मागील 24 तासात 6 हजार पेक्षा अधिक रुग्ण कोविडमुक्त!

Rohan_P

”…मग वर्षा गायकवाड तुम्ही विद्यार्थ्यांच्या जीवाशी का खेळत आहात?”

triratna
error: Content is protected !!