तरुण भारत

कार बाजारात तेजी, बुकिंगमध्ये वाढ

तीन प्रमुख कंपन्यांना पसंती : ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर वाढला

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मागील काही दिवसांपासून जीएसटीसह अन्य निर्णयामुळे वाहन क्षेत्रात मंदीचे वारे वेगाने वाहत होते. त्यामध्ये चालू आर्थिक वर्षात ही मरगळ कमी करण्यासाठी विविध टप्प्यावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे धोरण राबविण्यात येणार होते. परंतु याला कोविडच्या संकटाने पुन्हा मागे ढकलले असल्याचे दिसून आले आहे. आता लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळत असून देशात अनलॉक 1 ची सुरुवात झाली असून याचा फायदा वाहन क्षेत्रातील काही विभागांना सध्या होत असल्याचे निरीक्षणामधून सांगितले जात आहे.

सामाजिक अंतर राखत व अन्य सुरक्षेचे नियम पाळत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील मिळणाऱया सुविधेच्या जोरावर देशातील तीन मोठय़ा कार कंपन्यांचे बुकिंग वेगाने होत आहे. यामध्ये प्रामुख्याने मारुती सुझुकी, हय़ुंडाई आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा या कंपन्यांच्या कार्सना मागणी वाढली असून कार्सच्या बुकिंगमध्ये आणि चौकशीत वाढ झाली असून याचा वेग कोविड19 च्या अगोदरच्या कालावधीपेक्षा जवळपास 85 टक्क्मयांवर पोहोचला आहे.

ग्राहकांकडून चौकशीवर भर

बुकिंगसह अन्य गोष्टींची चौकशी करण्यासाठी कोरोनाच्या भीतीपोटी ग्राहक सध्या फोन कॉल करुन कार खरेदीसह अन्य माहिती जास्तीत जास्त विचारताना दिसत आहेत. अशांची संख्या अलीकडे वाढलेली आहे. कार कंपन्यांनी हॉट मॉडेल्सचे प्री बुकिंग सुरु केले होते. होंडा कार्स इंडिया लिमिटेडने आपल्या लोकप्रिय असणाऱया सेडन कार सिव्हीकच्या बीएस 6 प्रणालीच्या मॉडेलचे प्री बुकिंग सुरु केले आहे तर पेटाने नवीन गाडीच्या बुकिंगमध्ये 30 हजारचा टप्पा पार केला आहे. तज्ञांच्या माहितीनुसार येत्या काळातही यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. 

Related Stories

लवकरच मोबाईल, टीक्ही कपडय़ांची ऑनलाईन विक्री

Patil_p

चालू वर्षात बँकांचा एनपीए वाढण्याचे संकेत

Patil_p

झोमॅटोचा पुरवठा पूर्वपदावर आल्याचा दावा

Patil_p

इंडिगोची दोन आसने बुकींगची विशेष योजना

Patil_p

स्टेट बँकेकडून लॉकर शुल्कात वाढ

tarunbharat

गुगल पे, कार्ड आधारीत पेमेंटसाठी व्हिसाशी भागीदारी

Patil_p
error: Content is protected !!