तरुण भारत

उपचारासाठी आलेल्या अनोळखीचा सिव्हिलमध्ये मृत्यू

ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

वैद्यकीय उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेल्या एका अनोळखीचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात ही घटना घडली असून एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

शुक्रवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास सुमारे 50 वषीय अनोळखी ओपीडी चिठ्ठी बनविण्यासाठी रांगेत उभा होता. रांगेत उभे असतानाच अचानक तो खाली कोसळला. त्याला तातडीने अतिदक्षता विभागात हलविताना त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या अनोळखाचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आला आहे.

5.6 फूट उंची, लालसर रंग, अंगाने सडपातळ असे त्याचे वर्णन आहे. त्याच्या डोक्मयात काळे, पांढरे केस आहेत. तर चेहऱयावर बारीक दाढी आहे. त्याने आपल्या अंगावर राखाडी शर्ट, खाकी पॅन्ट व राखाडी जॉकेट परिधान केला होता. वरील वर्णनाच्या अनोळखी विषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405250 या क्रमांकावर एपीएमसी पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. शहरातील सर्व पोलीस स्थानकांना यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. हा 50 वषीय अनोळखी ओपीडी चिठ्ठी बनविण्यासाठी रांगेत उभा होता. आणखी थोडावेळ निघून गेला असता तर त्याच्या विषयाची माहिती ओपीडी काऊंटरमध्ये मिळाली असती. मात्र तो काऊंटरला पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

भाजी मार्केट बंद ठेवल्याने शेतकऱयांची गैरसोय

Amit Kulkarni

मनपा वॉर्ड पुनर्रचनेबाबत संभ्रम

Patil_p

‘डॉक्टर गावाकडे चला’ योजनेचा शुभारंभ

Omkar B

बसपासकडे दुर्लक्ष : परिवहनच्या महसुलावर परिणाम

Amit Kulkarni

उद्योग खात्रीत काम करणाऱया कामगाराची दोन बोटे निकामी

Patil_p

डॉक्टरांचे आंदोलन मागे, कोरोना रुग्णांची नोंद सुरु

Patil_p
error: Content is protected !!