तरुण भारत

रविवारी दिसणार कंकणाकृती सूर्यग्रहण

वृत्तसंस्था/ हैद्राबाद

या दशकातील पहिलेच कंकणाकृती सूर्यग्रहण येत्या रविवारी भारताच्या काही भागात दिसणार आहे. सकाळी नऊच्या सुमारास ग्रहण स्पर्श असून ही पर्वणी साधण्यासाठी राजस्थान आणि हरियाणामध्ये संशोधकांची गर्दी होण्याची शक्मयता आहे. सध्या पावसाळा असल्याने ग्रहण दिसण्याबद्दल साशंकता असली तरी रविवारी आकाश निरभ्र असेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

हवामान खात्यानेही उत्तर भारतात आकाश निरभ्र असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. भारतात हे ग्रहण राजस्थान आणि हरियाणा या दोनच राज्यांमध्ये कंकणाकृती स्वरुपात दिसणार आहे. इतरत्र ते खंडग्रास स्वरुपात पाहावयास मिळणार आहे. यानंतरचे कंकणाकृती सूर्यग्रहण एकदम 2022 मध्येच दिसणार आहे, असे तज्ञांनी म्हटले आहे.

भारताच्या काही भागांप्रमाणेच हे ग्रहण आफ्रिका खंडाचा काही भाग, आग्नेय युरोप, मध्यपूर्वेतील देश, उत्तर आणि पूर्व रशिया वगळता आशिया खंड, इंडोनेशिया व इतरत्र पाहावयास मिळणार आहे.

भारतातील ग्रहणमार्ग

भारतात कंकणाकृती स्वरुपात हे ग्रहण प्रथम राजस्थानातील सुरतगड येथे दिसेल. त्यानंतर ते हरियाणातील शिरसा व कुरुक्षेत्र व त्यानंतर डेहराडून, चमोली आणि जोशीमठ या उत्तराखंडमधील काही प्रदेशांमध्ये दिसणार आहे

Related Stories

चकमकीत जवान हुतात्मा; एका दहशतवाद्याचा खात्मा

Patil_p

पीडितेच्या हातावरील टॅटू पाहून न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

pradnya p

पंतप्रधान मोदी उद्या IPS प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधणार संवाद

pradnya p

तैवानच्या संरक्षण तरतुदीत मोठी वाढ

Patil_p

निवडणुकीपूर्वी तृणमूलमध्ये बंडखोरीची चिन्हे

Patil_p

विद्यार्थिनीची छेडछाड; वाराणसीतील माजी आमदाराला महाविद्यालयाच मारहाण

datta jadhav
error: Content is protected !!