22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील सहाजणांची आत्महत्या

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील सहाजणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या सहाजणांचे मृतदेह सिलिंग फॅनला लटकताना आढळून आले. मृतांमध्ये चार मुलांचा समावेश असून त्यांचे वय 7 ते 12 वर्षांपर्यंत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या आत्महत्या सत्राचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

अमरीश व गुरंग पटेल अशी यातील वयस्करांची नावे आहेत तर मृत मुले त्यांच्याच परिवारातील आहेत. फ्लॅटही त्यांच्याच मालकीचा असल्याचे इन्स्पेक्टर डी. आर. गोहिल यांनी सांगितले. ते दोघेही शहरात वेगवेगळय़ा ठिकाणी राहत होते. 17 रोजी ते मुलांसह बाहेर पडले होते. तथापि घरी न आल्याने त्यांच्या पत्नींनी पोलिसांना याची माहिती दिली. या दोघांनी मुलांना आधी बेशुद्ध करुन मारले व नंतर स्वतः फास लावून घेतला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

Related Stories

वाहनचालकांना दिलासा, फास्टॅगसाठी मुदतवाढ

pradnya p

हबीबगंज रेल्वेस्थानकाचे नाव बदलण्याची मागणी

Patil_p

वॉर्डबॉयचा मृत्यू लसीमुळे नाही

Patil_p

‘फॉरएव्हर म्यूट’ पर्याय सादर

Patil_p

पंजाब : लुधियानाचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांना कोरोनाची लागण

pradnya p

उत्तर प्रदेश : भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी यांना कोरोनाची बाधा

pradnya p
error: Content is protected !!