तरुण भारत

सातारा जिल्हा अव्वल ठेवू

प्रतिनिधी/ सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केलेले अभिप्राय अभिप्राय अभियान जिह्यात सक्षमपणे राबवून आपला सातारा जिल्हा पुन्हा अव्वल ठेवूयात. सातारा जिह्यातील प्रत्येक कार्यकर्ता हा या अभियानाशी जोडला गेला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. दरम्यान, साहेबांचा जिल्हा आहे म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यानी, पदाधिकाऱयांनी झोकून देवून काम करा, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले आहे.

Advertisements

अभिप्राय अभियानाच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले,ट उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, दीपक पवार, देवराज पाटील, दत्ता नाना धमाळ, बाबुराव सपकाळ, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, जयश्री पाटील, कविता म्हेत्रे, राजाभाऊ उंडाळकर, सतिश चव्हाण, भास्कर कदम, मिलिंद नेवसे, राजकुमार पाटील, शफीक शेख, तेजस शिंदे, अतुल शिंदे, युवराज सूर्यवंशी, बाळासाहेब सावंत, दत्तात्रय साळुंखे, मारुती इदाटे, निवास शिंदे, गोरखनाथ नलावडे, प्रसन्न बाबर, राजेंद्र कचरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार साहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. या पक्षाचे अभिप्राय अभियान सुरु आहे. या अभियानात सातारा जिल्हा अव्वल स्थानावर राहण्याकरता प्रत्येक कार्यकर्त्यांने काम केले पाहिजे. सातारा जिल्हा हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. तर विधानसभा मतदार संघात कोरेगाव हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. फलटण विधानसभा सहाव्या क्रमांकावर आहे. बाकीच्या विधानसभा मतदार संघांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याकरता प्रंटल सेलच्या पदाधिकाऱयांनी काम करणे गरजेचे आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन केले.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा हा कायम पवारसाहेबांच्या पाठीशी आहे. स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा आहे आणि कायम राहिल. हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झटून काम केले पाहिजे. अभिप्राय अभियानाची मुदत 25 जूनपर्यंत आहे. जास्तीत जास्त अभिप्राय नोंदवून जिल्हा अव्वल करुयात असे आवाहन केले.

रामराजे म्हणाले, 1999 पासून सातारा जिह्याची घौडदौड सुरु आहे. ती कायम राहिल. पक्षाने जी जबाबदारी प्रत्येकाने बुथ कमिटीच्या अध्यक्षावर दिली आहे. ती पार पाडावी. स्थानिक स्वराज्य समितीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन करण्यात आले.

Related Stories

राज्यात सातारा जिल्हा वाहतूक पोलीस नंबर वन

Abhijeet Shinde

कोविड रूग्णालयांना कराडकरांनी पुरवला ऑक्सिजन

Patil_p

यंदाही संतांची एसटीनेच पंढरीची आषाढी वारी

Abhijeet Shinde

ग्रीन फिल्ड हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी चौदा जणांवर गुन्हा

Patil_p

सातारा जिल्ह्यासाठी गृह विलगीकरण उपाययोजना पुस्तिकेचे आरोग्यमंत्र्याच्या हस्ते प्रकाशन

Abhijeet Shinde

‘ऑनलाईन’ शिक्षणामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!