तरुण भारत

कृष्णा नदीच्या पातळीत 10 फुटांनी वाढ

वार्ताहर/ मांजरी

मांजरी परिसरात पावसाने हजेरी लावली असून कृष्णा नदीची पाणीपातळी गेल्या 48 तासात 10 फुटांनी वाढली आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मान्सूनच्या पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नदीकाठी बसविण्यात आलेल्या मोटारी सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी गेले दोन दिवस शेतकरी धडपडताना दिसत आहेत.

Advertisements

जुना पूल पाण्याखाली

कृष्णा नदीवर मांजरी येथे असलेला ब्रिटीशकालीन पूल पाणीपातळी वाढल्याने पाण्याखाली गेला आहे. ब्रिटीश काळापासून हा पूल वाहतुकीचा प्रमुख मार्ग होता.  1920 साली या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. यावषी त्याला शंभर वर्षे पूर्ण होत असून हा पूल गेल्या दोन दिवसात वाढलेल्या पाणीपातळीमुळे पाण्याखाली गेला. या पुलानजीकच दुसरा एक बंधारा बांधण्यात येत असून तोही पाण्याखाली गेला आहे. पाण्याची पातळी दिवसाला दोन ते तीन फूट अशी वाढतच आहे.

Related Stories

पहिल्या टप्प्यात 264 मतदान केंद्रे संवेदनशील

Patil_p

विजापुरात दोघा संशयित आरोपींना कोरोना

Patil_p

जीवनात यशस्वी होण्यासाठी क्रीडा आवश्यक

Patil_p

‘कोरोना’च्या छायेतील ‘श्रावण’; नियमांचे करा आचरण

Patil_p

‘अभाविप’ विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना

Patil_p

मतदानाचा टक्का घटला

Amit Kulkarni
error: Content is protected !!