तरुण भारत

त्या वृत्तवाहिन्यांवर कारवाई करा

प्रतिनिधी/ बेळगाव

संत हजरत ख्वॉजा यांच्यावर एका खासगी वृत्तवाहिनेचे संपादकांनी टिका केली आहे. याचबरोबर आजतकच्या ऍंकर स्वेता सिंग भारत-चीन मध्ये झालेल्या धुमश्चक्रीबद्दलही चुकीची माहिती दिली आहे. त्यांनी भारतीय सैनिकांबद्दल गैरसमज पसरविलाआहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मी या संघटनेने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

Advertisements

आरपार या कार्यक्रमामध्ये संत हजरत ख्वॉजा यांच्याबद्दल चुकीची माहिती आणि त्यांच्यावर टिका केली आहे. यामुळे मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. अशा प्रसारामुळेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. त्यातून जातीय दंगल घडत आहे. तेंव्हा अशा प्रकारे टिका करणाऱयावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

तेंव्हा या दोन्ही प्रसारमाध्यमांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी यशपाल भोर, मतीन कुमार, सुनील कोटबागी, मुन्वर हुसेन यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

उचगाव येथील भाजलेल्या महिलेचा अखेर मृत्यू

sachin_m

पंपहाऊसमध्ये बिघाड झाल्याने विविध भागात पाणी नाही

Patil_p

अहवाल येण्यापूर्वीच शिक्षक कोरोना ‘निगेटिव्ह’

Amit Kulkarni

तालुक्मयातील 65 गावांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवा

Amit Kulkarni

मंत्री शशिकला जोल्ले यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

Patil_p

परतीच्या पावसामुळे बळीराजा सापडला संकटात

Patil_p
error: Content is protected !!