तरुण भारत

बाणावलीतील मच्छीमारांकडून 5 कासवांना जीवदान

बेवारस जाळय़ात अडकली होती कासवे, जाळे कापून समुद्रात सोडून दिले

प्रतिनिधी / मडगाव

बाणावली येथील मच्छीमार पेले हा काटाळय़ाद्वारे मासेमारी करण्यासाठी बाणावली किनाऱयावर आला असता त्याला पाण्यातील एका बेवारस जाळय़ात काही कासवे अडकल्याचे आढळून आले. यावेळी सदर कासवांना त्या जाळय़ातून मुक्त करून पुन्हा समुद्रात सोडून जीवदान देण्यात आले.

सध्या मासेमारी बंद असून किनाऱयावर काटाळी व अन्य पद्धतीने मासेमारी केली जात असते. अशा प्रकारे मासेमारी करण्यासाठी पेले आपल्या अन्य काही सहकाऱयांसह बाणावली किनाऱयावर आला होता. तेथेच एका फेकून देण्यात आलेल्या जाळय़ात काही कासवे अडकल्याचे पेले याच्या नजरेस आल्यावर त्याने सदर जाळे कासवांसह किनाऱयावर आणले व कोयत्याने जाळे कापून या कासवांची सुटका केली.

5 मध्यम आकाराची कासवे नंतर समुद्रात सोडून त्यांना जीवदान देण्यात आले. कासव हे संख्या कमी होत चाललेल्या प्रजातीतील असून पर्यावरणासाठी त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना जीवदान देण्यात आल्याचे पेले याने सांगितले. देवाचे आम्ही धन्यवाद मानतो. कारण ती जाळय़ात अडकलेली कासवे आमच्या नजरेस आली. अन्य कोणाच्या हाती लागली असती, तर त्यांना जीवदान मिळण्याची शाश्वती नव्हती. कारण काही जण कासवाचे मांस खात असतात. या लॉकडाऊनच्या काळात हातात पैसे नसल्याने अशी कासवे सापडल्यास त्यांना विकूनही टाकले गेले असते, अशी प्रतिक्रिया पेले याने व्यक्त केली.

Related Stories

‘सदृढ कुटुंब सदृढ समाज’ जागृती मोहीम आजपासून

Amit Kulkarni

संस्कृती रक्षणासाठी भासुमंच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा

Amit Kulkarni

पोलीस उपनिरीक्षक तुळशीदास नाईक यांना बढती

Omkar B

किरण ठाकुर यांच्याकडून निर्णयाचे जोरदार स्वागत

Omkar B

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांचे आमरण उपोषण सुरु

Amit Kulkarni

काणकोणचा पाण्याचा प्रश्न 19 डिसेंबरपर्यंत सोडवा

Patil_p
error: Content is protected !!