तरुण भारत

२४ वर्षानंतर गणेशवाडीमधील विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयात निवड

कसबा बीड/ प्रतिनिधी

गणेशवाडी तालुका करवीर येथे २४ वर्षानंतर स्वरूप एकनाथ माने व अवधूत मनोज माने या दोन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली. दोन्ही विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने गावांमध्ये या दोन्ही मुलांचे कौतुक होत आहे. हे दोन्ही विद्यार्थी स्वयंभू अकॅडमीचे विद्यार्थी असून यांना प्रशांत चव्हाण सर, सर्व शिक्षक वृंद, आई-वडील यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisements२४ वर्षांपूर्वी रूपाली चव्हाण या मुलीची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली होती. त्यानंतर आता स्वरूप व अवधूत माने यांची निवड झाल्याने गावात व भागात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी दोन्ही विद्यार्थ्यांचे पालक, सर्व कुटुंबीय, शिक्षक प्रदीप माने ज्ञानदेव यादव, गावातील सर्व मान्यवर, पोलीस -पाटील धनश्री मेढे आदी उपस्थित होते. 

रूपाली मारुती चव्हाण याची २४ वर्षांपूर्वी शैक्षणिक वर्ष १९९५-९६ ला जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली होती. आता त्या समाज कल्याण निरीक्षक म्हणून सातारा येथे कार्यरत आहेत. गणेशवाडी येथे पहिला मानाचा तुरा मिळालेली पहिली महिला म्हणून त्यांनी मान पटकावला होता. कॉलरशिप पासून स्पर्धा परिक्षे पर्यंत अथक परिश्रम चिकाटी यांच्या जोरावरती त्यांनी स्वतःचे करिअर घडवले आहे. यातून नवीन पिढीने  बोध घेवून स्वतःची प्रगती करावी असे त्यांचे म्हणणे आहे.Related Stories

अब्दुल समद शेख यांना पुरस्कार

Abhijeet Shinde

चार वर्षाच्या चिमुकलीचा लैंगिक अत्याचार करून खून

Abhijeet Shinde

लोकमान्यांनी भेट दिलेले `गीतारहस्य’ मिरजेत

Abhijeet Shinde

मिरज : रोझावाडी येथील माजी उपसरपंचाचा कोरोनाने मृत्यू

Abhijeet Shinde

इचलकरंजीत कॅसिनो व जुगार अड्यावर छापा

Abhijeet Shinde

पर्यटन सप्ताह; राधानगरी पर्यटन वाढीस चालना मिळेल : अभिजित तायशेटे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!