तरुण भारत

हिमाचल प्रदेशात 23 नवे कोरोना रुग्ण; एकूण आकडा 618 वर

ऑनलाईन टीम / हमिरपुर : 


हिमाचल प्रदेशात कोरोनाच्या संसर्गाने जोर धरला असून शुक्रवारी प्रदेशात 23 नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कागडा जिल्ह्यात एकाच वेळी 8 जण आढळले आहेत. जिल्ह्यातील चडियार भागात 29 आणि 32 वर्षीय व्यक्ती,  गगलमधील 28 वर्षीय आणि 51 वर्षीय व्यक्ती, थुरल मधील 59 वर्षीय व्यक्ती, बैजनाथ भागातील 29 वर्षीय महिला आणि पंचरुखी भागातील 29 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. 

Advertisements


पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व रुग्णांना बैजनाथ येथे नेण्यात आले आहे. त्यातच सोलन जिल्ह्यात देखील कोरोनाने आता शिरकाव केला आहे. जिल्ह्यात 5 नवे रुग्ण आढळले आहेत. यामधील चार जण होम क्वारंटाइन तर एक जण संस्थात्मक क्वारंटाइन वाॅर्डमध्ये होता. हे चंबाघाट आणि राधास्वामी सत्संग मधून आले होते. येथून चार जण एकाच परिवारातील आहेत, असे सांगण्यात येत आहे. 

तसेच उधम हमीपुर जिल्ह्यातून देखील एकाच वेळी 10 नवे रुग्ण समोर आले आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेशामध्ये कोरोना रुग्णांची एकूूण संख्या 618 वर पोहोचली असून 326 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर  376 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Related Stories

खुल्या जागेवर नमाज पठण करण्यास मुख्यमंत्री खट्टरांचा विरोध

Abhijeet Shinde

भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी आदेश गुप्ता

datta jadhav

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी 15 हजारपेक्षा अधिक रुग्ण

Rohan_P

पेट्रोल – डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घट

Rohan_P

भारताच्या प्रत्युत्तराने POK चे मोठे नुकसान; नेत्यांची कबुली

datta jadhav

आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!