तरुण भारत

मेट्रॉलॉजी प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरण प्रस्तावाला मंजूरी

प्रतिनिधी / गोकुळ शिरगाव

केआयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. डॉ. गिरीश नाईक आणि प्रा. अजय मधाळे यांनी मेट्रॉलॉजी प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेला दिलेला प्रस्ताव मंजूर झाला असून या प्रस्तावापोटी 11 लाख 57 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापूर्वीही प्रा. डॉ. गिरीश नाईक यांनी केआयटीच्या कार्यशाळेच्या आधुनिकीकरणासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेला प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी 13 लाख 75 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. अभियांत्रिकी शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि लघु उद्योजकांना अशा अद्ययावत तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेला देशभरातून असे प्रस्ताव दाखल झालेले असतात.

Advertisements
प्रा. डॉ. गिरीश नाईक आणि प्रा. अजय मधाळे

या सर्व प्रस्तावांची छाननी होऊन त्यांचे सादरीकरण केले जाते. या प्रक्रियेतून हे प्रस्ताव मंजूर होतात. मेट्रोलॉजी अभियांत्रिकीमध्ये तंतोतंत मापनपध्दती प्रक्रियेत सातत्य आणि गुणवत्ता टिकून राहण्यासाठी उच्च तंत्रज्ञानयुक्त आधुनिक उपकरणांची गरज असते. विद्यार्थी आणि लघु उद्योजकांना अशा उपकरणांची गरज असते. ही गरज लक्षात घेऊन प्रा. डॉ. गिरीश नाईक आणि प्रा. अजय मधाळे यांनी हा प्रस्ताव अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेला सादर केला होता. प्रा. डॉ. गिरीश नाईक आणि प्रा. अजय मधाळे यांना हा प्रस्ताव सादर करण्यासाठी केआयटीचे चेअरमन मा. भरत पाटील, व्हाईस चेअरमन मा. सुनिल कुलकर्णी, सेक्रेटरी मा. दिपक चौगुले, केआयटीच्या अभियांत्रिकी कॉलेजचे डायरेक्टर प्रा. डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

साताऱयात दुचाकीस्वारांवर कडक कारवाई

Patil_p

मेगा भरती विरोधात मराठा क्रांतीचे आंदोलन तीव्र

triratna

महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी प्रा. दिवाकर गमे यांची नियुक्ती

triratna

वारणा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; पडझडीने नुकसान

triratna

कोल्हापूर जिल्ह्यात रात्री आठ पर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३३१ वर

triratna

मातोश्री रमाबाई आंबेडकर सुतगिरणीच्या प्रशासक निवडीला स्थगिती

triratna
error: Content is protected !!