तरुण भारत

भरधाव कारने दुचाक्यांचा केला चुराडा; दोन जण जखमी

सातारा/प्रतिनिधी

येथील महानुभव मठ परिसरात भरधाव स्वीफ्ट कार उलटय़ा दिशेने चालवून दुचाक्यांचा चुराडा केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नेंद शाहुपूरी पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत झाली नव्हती. घटनेमुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. नशीब बलत्वर म्हणून मोठा अनर्थ टळल्याची चर्चा सुरु होती.

याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की सातारालगतच्या एका तालुक्यातील एका बड्या बापाच्या पुत्राने स्वीफ्ट कार भरधाव वेगाने दामटत चालला होता. उलटय़ा दिशेने त्याने ती कार दामटत तब्बल पाच ते सहा दुचाक्यांना ठोकर मारत तो तसाच पुढे चालला. या दरम्यान, मोठा आवाज झाला. दुचाक्यांचे मोठे नुकसान झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. धडक मारलेली ती कारही तेथेच थांबवून त्यांने तेथून पोबारा केल्याचे समजते. जखमी झालेल्या त्या दोन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेची नोंद उशीरापर्यंत शाहुपूरी पोलिसात झाली नव्हती.

Related Stories

नव्या मासेमारी नियंत्रण कायद्याला स्थगिती द्या!

Patil_p

आपत्तीग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करावे

Patil_p

३६ जिल्ह्यांना आमदार रोहित पवारांकडून मदत

Abhijeet Shinde

‘त्या’ कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील संशयित आठ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह

Abhijeet Shinde

भाजपमध्ये सर्व उपरे; शिवसेनेने केलेल्या टीकेला प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

Abhijeet Shinde

आनेवाडी टोलनाका हस्तांतरण व ताबा प्रकरणाची पुढील सुनावणी 7 डिसेंबरला

Patil_p
error: Content is protected !!