तरुण भारत

कानपूरमध्ये भरदिवसा माजी बसपा नेत्याची गोळ्या घालून हत्या

ऑनलाईन टीम / कानपूर : 


उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शनिवारी भर दुपारी बहुजन समाज पार्टीचे माजी नेते नरेंद्र सिंह उर्फ पिंटू सेंगर यांनी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कानपूर येथील चकेरी भागात घडली. यावेळी हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. त्यानंतर जखमी झालेले नरेंद्र सिंह यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 


प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी नरेंद्र सिंह उर्फ पिंटू सेंगर हे जाजमऊ येथील केडीए आशियाना कॉलनीजवळ आपल्या इनोव्हा कारमधून उतरून फोनवर बोलत होते. त्याचेवळी दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामुळे रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत पिंटू सेंगर घटनास्थळीच कोसळले. तर, रस्त्यावर फार वर्दळ नाही हे पाहून, हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेथे त्यांना काही काडतुसे सापडली असून या प्रकारचा अधिक तपास सुरू आहे. आसपासच्या सीसीटिव्ही च्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. 

Related Stories

महाराष्ट्रानंतर आता ‘या राज्यातही ‘कोवॅक्सिन’ची कमी; सरकारकडून 100 सेंटर बंद

Rohan_P

”विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करावी ही अपेक्षा असेल तर ते चालणार नाही”

Abhijeet Shinde

अँटिग्वा-बारबुडामध्ये पोहोचला मेहुल चोक्सी

Amit Kulkarni

अमेरिकाही घालणार ‘टिकटॉक’वर बंदी

datta jadhav

महाराष्ट्र सरकार ‘रेमडेसिवीर’ची 10 हजार इंजेक्शन खरेदी करणार

datta jadhav

उत्तरप्रदेश अन् बिहारचा नकाशा लवकरच बदलणार

Patil_p
error: Content is protected !!