तरुण भारत

हरभजन चिनी उत्पादनावर बहिष्कार टाकणारा पहिला खेळाडू

एकाही चिनी उत्पादनाची जाहिरात करणार नाही : ट्वीटरवरुन घोषणा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

चिनी उत्पादनावर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेत भारताचा अव्वल ऑफस्पिनर हरभजन सिंगने थेट उडी घेतली असून आपण यापुढे चीनच्या एकाही उत्पादनाची जाहिरात करणार नाही, अशी घोषणा त्याने केली आहे. चिनी उत्पादनावर बहिष्कार घाला, अशा आशयाचे ट्वीटही त्याने केले.

या आठवडय़ाच्या प्रारंभी लडाखमधील गलवान खोऱयात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर चिनी उत्पादनावर बहिष्काराची मागणी सातत्याने होत आली आहे. अगदी केंद्रीय पातळीवरुन देखील असे दिशानिर्देश दिले गेले असून या मोहिमेत सामील होणारा हरभजन हा पहिला अव्वल खेळाडू ठरला आहे.

39 वर्षीय हरभजनने आपल्या ट्वीटवर हँडलवरुन चिनी उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर आवाहन केले. अखिल भारतीय व्यापारी संघटनेने याबद्दल हरभजनचे अभिनंदन केले. भारतीय व्यापारी संघटनेने यापूर्वीच चिनी उत्पादनावर बहिष्काराची हाक दिली आहे. पैसा की देशभक्ती याचा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा आहे, असे ते म्हणाले.

‘चिनी उत्पादनावर बहिष्काराच्या मोहिमेत सहभागी होणारा हरभजन पहिला स्टार खेळाडू ठरला आहे. याबद्दल त्याचे अभिनंदन. देशातील अव्वल खेळाडू, व्यक्ती, पदाधिकाऱयांनी या मोहिमेत सहभागी होणे महत्त्वाचे ठरेल. अवघा देश तुमच्याकडे अपेक्षेने पाहतो आहे. पैसा की देशभक्ती, याचा निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे’, असे व्यापारी संघटनेचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी ट्वीटरवर नमूद केले.

हरभजनचा प्रत्यक्ष मैदानावर देखील बोलबाला राहिला असून त्याने 103 कसोटीत 417 तर 236 वनडेत 269 बळी घेतले आहेत. याशिवाय, खेळलेल्या 28 टी-20 सामन्यात त्याच्या खात्यावर 25 बळी नोंद आहेत. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत हा दिग्गज गोलंदाज चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून खेळणे अपेक्षित आहे. कोव्हिड-19 च्या गंभीर संकटामुळे तूर्तास ही स्पर्धा अनिश्चित कालावधीकरिता लांबणीवर टाकली गेली आहे.

Related Stories

जर्मन, डच मोटो जीपी शर्यत रद्द

Patil_p

इंग्लंडच्या फलंदाज प्रशिक्षकपदी ट्रॉट

Patil_p

‘फिट इंडिया फ्रीडम रन’चे व्हर्च्युअल उद्घाटन

Patil_p

बेळगावचा विवेक कापाडिया राष्ट्रीय रेस स्पर्धेत उपविजेता

Omkar B

बोस्नियाकडून 2 हजार फुटबॉल शौकिनांच्या उपस्थितीला परवानगी

Patil_p

गावसकर म्हणतात षटकात दोन बाऊन्सर्सची परवानगी द्या!

Patil_p
error: Content is protected !!