तरुण भारत

तीन महिन्यापासून पासपोर्ट सेवा केंद्र बंदच

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमध्ये सुरू पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र लॉकडाऊनपासून अद्याप बंद आहे. तीन महिने होत आले तरी अद्याप हे सेवा केंद्र बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. इतर सरकारी सेवा केंद्र सुरू असताना पासपोर्ट सेवा केंद्र बंद असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांना इतर जिल्हय़ांमध्ये जावून पासपोर्ट बनवून घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हे पासपोर्ट सेवा केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.

Advertisements

पासपोर्ट काढण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून देशातील सर्व पासपोर्ट सेवा केंद्र बंद करण्यात आली होती. या नंतर टप्प्याटप्याने लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले. तसतसे सरकारी कार्यालये सुरू करण्यात आली. काही नियम व अटी घालून नागरिकांना कार्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. एकाचवेळी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे.

बेळगाव पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये दररोज 100 नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत होती. त्यामुळे नागरिकांना हुबळीला न जाता बेळगावमध्ये पासपोर्स काढणे सोपे झाले होते. लॉकडाऊनमध्ये हे कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. परंतु नियम शिथील केल्यानंतर सेवा केंद्र सुरू करणे गरजेचे होते. हुबळी, मंगळूर, गुलबर्गा, बेंगळूर येथील सेवा केंद्र सुरू असताना बेळगावचे सेवा केंद्र बंद का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. वरि÷ अधिकाऱयांकडून आदेश मिळताच सेवा केंद्र सुरू करण्यात येईल, असे कर्मचाऱयांकडून सांगण्यात येत आहे.

Related Stories

दुचाकी अपघातात व्हन्नोळीच्या माजी सैनिकाचा मृत्यू

Patil_p

मुलांवर बालपणापासून संस्कार व्हावेत

Patil_p

टाळ-मृदंगाच्या गजरात निघाली ग्रंथदिंडी

Patil_p

स्मार्ट सिटी कामाच्या मुद्यावर कॅन्टोन्मेटमध्ये आरोप-प्रत्यारोप

Patil_p

जिल्हय़ात 49 नवे रुग्ण तर 46 जण कोरोनामुक्त

Amit Kulkarni

सोमवारपासून पुन्हा कठोर निर्बंधांची अफवा

Rohan_P
error: Content is protected !!