तरुण भारत

सिप्ला आणि हेटेरो भारतात घेणार ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या ‘रेमडेसिवीर’ औषधाचे उत्पादन घेण्यास दोन कंपन्यांना भारताच्या औषधी महानियंत्रक विभागाने परवानगी मिळाली आहे. सिप्ला आणि हेटेरो या कंपन्या आता भारतात रेमडेसिवीरचे उत्पादन घेतील.

Advertisements

कोरोनावर मात करण्यासाठी रेमडेसिवीर हे औषध उपयुक्त ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या औषधाला ग्रीन सिग्नल दिला होता. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या औषधाची निर्मिती करण्यास भारतीय कंपन्यांना परवानगी मिळाली आहे. सिप्ला आणि हेटेरो या कंपन्या या औषधाची निर्मिती करतील. तसेच त्यांना या औषधाची विक्रीही करता येईल. रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांना हे औषध देण्यात येईल.

दरम्यान, महाराष्ट्र सरकार ‘रेमडेसिवीर’च्या 10 हजार इंजेक्शनची खरेदी बांग्लादेशकडून करणार होते. मात्र, काही कारणांमुळे ही आयात थांबवण्यात आली. 

Related Stories

लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरसह अन्य एकाचा खात्मा

datta jadhav

राज्यातील ‘हे’ १८ जिल्ह्ये पूर्णपणे अनलॉक- विजय वडेट्टीवार

triratna

देशात 81,484 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

एचव्हीडीएस योजनेची कामे जलद गतीने पूर्ण करा : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

Rohan_P

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना वेगळा न्याय का ? ; जितेंद्र आव्हाडांवर भाजपची टीका

triratna

महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी, पूल टेस्टिंगला केंद्र सरकारची परवानगी

prashant_c
error: Content is protected !!