तरुण भारत

भारत-चीन वादावर मध्यस्थी करण्यास अमेरिका तयार

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावादामुळे भारत आणि चिनी सैन्यात हिंसक संघर्ष झाला. त्यानंतर दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला आहे. भारत-चीन वादावर अमेरिका लक्ष ठेवून आहे. हा वाद चर्चेतून सोडविण्यासाठी आम्ही मध्यस्थी करण्यासही तयार आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

Advertisements

ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ट्रम्प म्हणाले, भारत आणि चीनमध्ये सध्या लडाखमधील सीमावादावरून तणाव आहे. हा वाद चर्चेतून सोडविण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे. अमेरिका दोन्ही देशांवर लक्ष ठेवून आहे. तसेच भारत आणि चीनशी बोलत आहे. दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पुढे काय होते ते पाहू आणि या दोन्ही देशांची मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू.

यापूर्वीही अमेरिकेने दोन्ही देशात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, दोन्ही देशांनी ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या प्रस्तावाला नकार दिला. 

Related Stories

माणुसकीच सर्वोत्तम!

Patil_p

ब्रिटनमध्ये ‘कोविशिल्ड’ला मंजुरी; पण…

datta jadhav

रत्नागिरीत कोरोनाचे आणखी 62 रुग्ण

Abhijeet Shinde

UGC चे निर्देश : 1 ऑक्टोबरपासून सुरु होणार नियमित सत्र

Rohan_P

उभरत्या भारताला प्रतिस्पर्धी मानतो चीन : अमेरिकेचा विदेश विभाग

Patil_p

दिलासादायक : महाराष्ट्रातील 60 लाख 911 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P
error: Content is protected !!