तरुण भारत

कलाकारांनी मानले कोविड योद्धय़ांचे आभार

 कोविड संकटाच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता वैद्यकीय कर्मचारी नागरिकांसाठी लढत आहेत. या लढय़ात त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी तसेच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 23 वर्षीय कनिष्ठ डॉक्टर डॉ. ऐश्वर्या नायर हिने पुढाकार घेतला आहे. कोविड संकटाच्या काळात डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्यसेवक तसेच ज्यांनी या युद्धात प्राण गमावले आहे, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करण्याच्या हेतूने निधी संकलन केले जाणार आहे. या अभियानाचे नाव थँक यू कोविड योद्धा (टीवायकेवाय) असे आहे. त्याचे अनावरण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते त्यांच्या मुंबईतील येथील महापौर निवासस्थानी करण्यात आले. याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, अभिनेते सुशांत शेलार, जनसंपर्क अधिकारी राम कोंडिलकर, माध्यम सल्लागार रवि नायर, रामचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक शिंदे आणि सदस्य आदित्य शिंदे उपस्थित होते. सुप्रसिद्ध कलाकार विक्रम गोखले, सचिन खेडेकर, सुबोध भावे, शंकर महादेवन, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, अतुल परचुरे, किशोरी शहाणे, मफणाल कुलकर्णी, क्रांती रेडकर, प्राजक्ता माळी, संदीप कुलकर्णी, अजिंक्य देव, पुष्कर जोग, पुष्कर श्रोत्री, जितेंद्र जोशी, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, शशांक केतकर, सुशांत शेलार, प्रार्थना बेहरे, गायत्री दातार, सागर देशमुख, प्रथमेश परब, सई लोकर, वैभव तत्ववादी, प्रितम कांगणे आनंदा कारेकर, माधव देवचक्के, गौरीश चिपूरकर या कलाकारांनी कोविड विरोधातील थँक यू कोविड योद्धा या प्रकल्पात सहभाग दिला आहे. हे सर्व कलाकार लोकमान्य या चित्रपटातील जीवन आपुले सार्थ करा रे, या गाण्याच्या पार्श्वभूमीवर जनतेला हे आवाहन करत आहेत. डॉ. ऐश्वर्या नायर हिने यावेळी बोलताना सांगितले की, इतर उद्योगाप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रातील कामगारांची देखील अवस्था येत्या काळात बिकट होणार आहे. पुढच्या काही महिन्यांत या आरोग्य कर्मचाऱयांना खडतर सामना करावा लागणार आहे. आर्थिक परिस्थितीबाबत देखील अनेक आव्हानं त्यांच्यासमोर उभी राहणार आहेत. अशावेळी श्रीमंत असो किंवा गरीब प्रत्येकाला आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणे अवघड होणार आहे. त्यामुळेच या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी असे काही केले पाहिजे की त्यांच्या आयुष्यात फरक पडेल. त्यामुळेच हे अभियान त्याचा एक भाग आहे. व्हिडिओ पॅलेसचे नानिकभाई जयसिंगानी यांनी देखील सामाजिक कार्यासाठी लोकमान्य चित्रपटातील गीत उपलब्ध करून दिले आहे. नागरिकांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांना थँक यू कोविड योद्धाचा निधी कमीत कमी 99 रुपयांपासून जमा करता येईल. त्याचा खाते तपशील- रामचंद्र प्रतिष्ठान, खाते क्रमांक 103103130002673 (आयएफएससी कोड SVCB 0000031),  शामराव विठ्ठल सहकारी बँक, दादर. डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेवक हे योद्धा तसेच त्यांच्यासोबत सेवा देताना आयुष्य गमावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी हा खारीचा वाटा आहे, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Related Stories

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा बायोपिक लवकरच पडद्यावर

Patil_p

पुन्हा झळकणार शाहरुख-काजोलची जोडी

Amit Kulkarni

इन्स्टाग्रामवर जरीनचे 1 कोटी फॉलोअर्स

Patil_p

ट्रोलिंगला अनन्याचे सडेतोड प्रत्युत्तर

Amit Kulkarni

”सुशांतसिंग मृत्यू प्रकरणाला एक वर्ष उलटल्यानंतरही सीबीआय गप्प का?”

Abhijeet Shinde

‘इतिहासाच्या योग्य बाजूने उभे राहा’, सोनम कपूरचा देशवासीयांना सल्ला

tarunbharat
error: Content is protected !!