तरुण भारत

ट्रम्प यांनी चीनला डिवचले

कोरोनाचा ‘कुंग फ्ल्यू’ असा उल्लेख

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisements

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घातक कोरोना विषाणूच्या जगभरातील फैलावासाठी पुन्हा एकदा चीनला जबाबदार धरले आहे. ट्रम्प यांनी कोरोना विषाणूमुळे होणाऱया आजाराला ‘कुंग फ्ल्यू’ नाव दिले आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये वुहान शहरातून फैलावलेल्या कोरोना महामारीसाठी ट्रम्प यांनी वारंवार चीनवरच ठपका ठेवला आहे. ट्रम्प प्रशासनाने कोरानाला वुहान विषाणू असेही संबोधिले आहे.

महामारीच्या काळातही ट्रम्प यांनी ओक्लाहोमा येथील सभेला संबोधित केले आहे. कोविड-19ला अन्य कुठल्याही आजाराच्या तुलनेत प्रचंड नावे प्राप्त झाली आहेत. या महामारीला कुंग फ्ल्यू असेही म्हणता येईल. कोरोनाच्या 19 वेगवेगळय़ा नावांचा उच्चार मी करू शकतो. अनेक लोक याला विषाणू, फ्ल्यू म्हणत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कुंग फ्ल्यू शब्द चीनच्या पारंपरिक मार्शल आर्ट ‘कुंग फू’शी साधर्म्य दर्शविणारा आहे. ट्रम्प यांच्या या नव्या उल्लेखामुळे चीनच्या संतापात भर पडणार हे निश्चित.  ट्रम्प यांनी कोरोना महामारीकरता चीन कारणीभूत असल्याचा आरोप जाहीरपण केला आहे.

Related Stories

153 देशांमध्ये संसर्ग, 5839 जणांचा मृत्यू

tarunbharat

वणव्यापासून झाडांना वाचविण्यासाठी लढविली शक्कल

Patil_p

ब्रिटनमध्ये तीन लाख टन वजनाचे हवेत उडणारे जहाज ?

Patil_p

इटलीत संक्रमण वाढले

Omkar B

अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन अत्याचार,तरुणास अटक

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीवर रोहित पवारांनी केली खास पोस्ट, म्हणाले…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!